इंडियन प्रीमियर लीगचा 16वा हंगाम यावर्षी खेळला गेला. हंगामात एकापेक्षा एक रोमांचक सामने चाहत्यांना अनुभवायला मिळाले. सोबतच विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हग ही तीन नावेही संपूर्ण हंगामात चर्चेता विषय होती. लीगची सुरुवात 31 मार्च रोजी झाली होती. 30 एप्रिलपर्यंत आयपीएलमध्ये एकही मोठा बाद झाला नव्हता. पण 1 मे रोजी आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्समधील सामन्यात हा वाद पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने नवीन आणि आपला सहकारी गौतम गंभीरवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सच्या यजमानपदामध्ये आरसीबीने लीग स्टेजचा सामना खेळला. या सामन्यादरम्यान आरसीबीचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) खूपच आक्रमक अंदाजात खेळत होता. श्रेत्ररक्षणावेळीही विराटचा आक्रमकपणा कमी नव्हता. नेमके याच वेळी खेळपट्टीवर फलंदाजीला आलेला नेवीन आणि विराटमध्ये शाब्दक वाद वेटला होता. सामना संपल्यानंतर देखील दोघांमधील वाद पाहायला मिळाला. गौतम गंभीर (Gautam Gambhir) लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर असल्याने त्याने नवीनच्या समर्थनार्थ वादात भाग घेतला. विराट आणि गंभीरमध्येही चांगलेच घमासान झाल्याचे संपूर्ण जगभराती क्रिकेटप्रमींनी पाहिले.
आता याच पार्श्वभूमीवर इरफान पठाण यांने आपले मत व्यक्त केले आहे. इरफानच्या मते विरट एक महान खेळाडू असून त्याला मैदानात सर्वांकडून आदर मिळणे अपेक्षित आहे. इरफान म्हणाला, “विराट एक मोठा आणि महान खेळाडू आहे. त्याचा आदर केलाच गेला पाहिजे. जर तुम्ही त्याला आक्रमकता दाखवू इच्छित असाल, तर मैदानात (लाईव्ह सामन्यात) दाखवा. मैदानाबाहेर त्याला आदर मिळालाच पाहिजे, ज्यासाठी तो पात्र आहे. ही गोष्टी प्रत्येक खेळाडू आणि युवा खेळाडूने विसरली नाही पाहिजे.” इरफान पठाणच्या या वक्तव्यानंतर चाहते वेगवेगळा अंदाज लावत आहेत. अनेकांच्या मते इरफानने या वक्तव्यातून नाव न घेता थेट गंभीरवरच निशाणा साधला आहे.
दरम्यान, या सामन्यातील वादानंतर आयपीएल व्यवस्थापनाकडून विराट आणि गंभीर यांच्यावर 100 टक्के सामना शुल्क कापण्याची कारवाई केली होती. तसेच अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्या सामना शुल्काच्या 50 टक्के रक्कम कापली गेली. विराट आणि नवीन यायंच्यातील हा वात पुढच्या अनेक सामन्यांपर्यंत लांबला. नवीनने वेळोवेळी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटवर निशाणा साधण्याचा प्रयत्नही केला. (Talking about Virat Kohli, Irfan Pathan targeted Gautam Gambhir without naming him)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
गुजरातविरुद्ध 14 चेंडूत 43 धावा चोपणाऱ्या तिलकला सेहवागचा लाख मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘तू फक्त…’