क्रिकेटच्या खेळात खेळाडूचा फिटनेस आणि शरीरयष्टी खेळाडूला इतरांपेक्षा वेगळे बनवते. फिटनेस असलेला खेळाडू आपल्या फिल्डिंगन अन् रनिंग बिटवीन द विकेटने मॅचमधील छोटे-छोटे क्षण आपल्या टीमच्या पारड्यात टाकतात आणि अंगापिंडाने मजबूत असलेले प्लेयर तर आपल्या पावरच्या जोरावर सिक्स-फोरचा पाऊस पडतात. त्यातही एखाद्या खेळाडूची उंची अधिक असेल तर तो खेळाडू उठून दिसतो. आपल्या ताडमाड उंचीने टीममेट्सच काय, अगदी चाहत्यांच्या गराड्यातही या खेळाडूंना ओळखणे सोपे जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच पाच क्रिकेटर्सविषयी जाणून घेणार आहोत, त्यांच्याकडे सर्वात उंच क्रिकेटपटू म्हणून पाहिले जाते.
मोहम्मद इरफान
क्रिकेटजगतातील सर्वात उंच क्रिकेटपटू कोण? हा प्रश्न विचारला गेल्यानंतर बऱ्याच जणांना याचे उत्तर माहीत असेल, तर जगातील सर्वात उंच क्रिकेटपटू आहे मोहम्मद इरफान. पाकिस्तानसाठी इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेल्या इरफानची उंची आहे ७ फूट १ इंच. अनेक क्रिकेटपटू म्हणतात तो बॉलिंग करतो म्हणजे असं वाटतं की, बॉल पहिल्या मजल्यावरून आपल्यापर्यंत येतोय. इरफाननं आपलं प्रोफेशनल क्रिकेट सुरूच केलं २१ व्या वर्षी. पाइपच्या कारखान्यात कामगार असलेल्या इरफानवर कोचेसने बरीच मेहनत घेऊन क्रिकेटर बनवलं. इरफान पाकिस्तानसाठी तिन्ही फॉर्मेटचे क्रिकेट खेळला. ८६ इंटरनॅशनल मॅच खेळलेला इरफान फक्त कन्सिस्टन्सी न राहिल्यान मेनस्ट्रीम क्रिकेटमधून बाहेर झाला.
हेही पाहा- क्रिकेटपेक्षा ज्यांच्या उंचींची जास्त चर्चा झाली, असे ५ क्रिकेटर
जोएल गार्नर
एकेकाळी ७० आणि ८०च्या दशकात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फक्त एका टीमची दहशत होती, आणि ती टीम म्हणजे वेस्ट इंडीज. त्यावेळी त्या संघाची दाखल होते त्या संघातील अस्सल फास्ट बॉलर्स. वेगवान चौकडी असलेल्या त्या बॉलींग अटॅकपैकी एक होते जोएल गार्नर. अतिशय तुफानी बॉलिंग करणाऱ्या गार्नर यांचे वैशिष्ट्य होते त्यांची उंची. गार्नर यांची उंची होती ६ फुट ९ इंचाची. मोहम्मद इरफान इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये येईपर्यंत तेच जगातील सर्वात उंच क्रिकेटर होते. अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डिंग आणि कॉलिंन क्राफ्ट यांच्यासोबत ते क्रिकेट इतिहासातील ऑल टाईम ग्रेट फॅब फोर फास्ट बॉलर बनलेले. आपल्या इंटरनॅशनल करिअरमध्ये १६० पेक्षा जास्त मॅच गार्नर यांच्या वाट्याला आल्या.
ब्रूस रीड
ब्रूस रीड. हे नाव कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकले असेल, पण या नावाचा क्रिकेटर जगातील तिसरा सर्वात उंच क्रिकेटर राहिला आहे. ब्रूस हे ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर. त्यांना ऑस्ट्रेलियासाठी २१ टेस्ट खेळायची संधी मिळाली. ज्यावेळी केरी पॅकर यांनी वर्ल्ड सिरीज क्रिकेटचा घाट घातला, त्यातील ते एक चर्चित नाव. ६ फूट ८ इंचाची उंची लाभलेल्या ब्रूस यांचं भारतीय संघाशी नातं राहिल. टीम इंडिया २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया टूरवर गेली असताना, याच दृश्यांनी इंडियन बॉलर्सला कानमंत्र दिलेले.
पीटर जॉर्ज
जगातील चौथा सर्वात उंच क्रिकेटर बनला पुन्हा एकदा एक ऑस्ट्रेलियन. त्याचं नाव पीटर जॉर्ज. पीटर जॉर्ज हे नाव यापूर्वी ऐकलेले मोजून चार दोन लोक सापडतील. कारण, फक्त एक इंटरनॅशनल मॅच खेळलेल्या प्लेयर ला कशाला कोण लक्षात ठेवेल? ६ फूट ८ इंच उंची असलेला पीटर एकच इंटरनॅशनल मॅच खेळला तीही भारताविरुद्ध. फास्ट बॉलर असलेला पीटर जी एक टेस्ट खेळला, ती देखील त्याने स्पेशल बनवली. कारण, त्याने त्या टेस्टमध्ये आउट केले ते खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला. डबल सेंच्युरी केलेल्या सचिनला बाद करण्यात तोच यशस्वी झालेला.
ख्रिस ट्रेमलेट
या यादीतील पाचवे नाव जवळपास सगळ्यांच्या ओळखीचे आहे. इंग्लंडचा हॅंडसम क्रिकेटर म्हणून ओळखला जाणारा ख्रिस ट्रेमलेट जगातील पाचवा सर्वात उंच क्रिकेटर. गुड लूक असलेल्या ट्रेमलेटला ६ फूट ७ इंचाची आकर्षक उंची लाभली. ख्रिस एक उत्कृष्ट फास्ट बॉलर होता, पण सतत एन्जर्ड असल्याने तो आपले इंटरनॅशनल करिअर लांबवू शकला नाही. याच दुखापतींमुळे केवळ २८ मॅचेसनंतर त्याला थांबावे लागले. ख्रिस नुकताच लिजेंड लीगमध्ये खेळायला आला असताना त्याने, बनवलेली बॉडी पाहून सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागं-पुढं न बघता, जेव्हा विराट गेलेला गंभीरच्या अंगावर धावून, नेमंक काय घडलं होतं?
कहाणी ‘दादा’लाच केकेआरमधून बाहेर काढण्याची, काय होतं गांगुलीला संघातून काढण्यामागील कारण