देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची मानली जाणारी विजय हजारे ट्रॉफी सध्या खेळली जात आहे. या स्पर्धेत सोमवार, 21 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू संघाने इतिहास घडवला. अरुणाचल प्रदेश संघासोबत खेळल्या गेलेल्या या लिस्ट ए सामन्यात तामिळनाडूने तब्बल 506 धावा कुटल्या. लिस्ट ए क्रिकेटमधील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील एवढी मोठी धावसंख्या याआधी झाली नव्हती.
बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियवर सोमवारी तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश संघ आमने सामने होते. नाणेफेक गमावल्यानंतर तामिळनाडू संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली, पण यादरम्यान त्यांनी ऐतिहासिक खेळी करून दाखवली. तामिळनाडूने या सामन्यात 50 षटकांमध्ये अवघ्या दोन विकेट्सच्या नुकसानावर 506 धावा केल्या. क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत कोणताच संघ लिस्ट ए (50 षटकांचा) सामन्यात 506 धावा करू शकला नव्हता. यापूर्वी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोता मोठी खेळी करणारा संघ इंग्लंड होता. पण सोमवारी तामिळनाडूने इंग्लंडला मागे टाकत या यादीत पहिला क्रमांक पटकावला.
50 षटकांच्या सामन्यात सर्वोत्तम खेळी करणाऱ्यांमध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आले. यांनी अरुणाचल प्रदेशविरुद्ध 506 धावा केल्या. दुसऱ्या क्रमांकावरील इंग्लंडने 2022 मध्येच नेदरलँड्सविरुद्ध 4 विकेट्सच्या नुकसानावर 498 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर काउंट संघ सरे आहे. 2007 मध्ये ग्लुसेस्टरशायर संघाविरुद्ध सरे संघाने 4 विकेट्सच्या नुकसानावर 496 धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर पुन्हा इंग्लंडचे नाव आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळताना इंग्लंडने 6 विकेट्सच्या नुकसानावर 481 धावा केल्या होत्या. यादीत पाचव्या आणि शेवटचा क्रमांक आहे भारत अ संघाचा. 2018 मध्ये भारत अ संघाने लिसेस्टरशायर संघाने 4 विकेट्सच्या नुकसानावर 458 धावा केल्या.
50 षटकांच्या सामन्यात सर्वोत्तम खेळी करणारे संघ
तामिळनाडू – 506/2 विरुद्ध अरुणाचल प्रदेश (2022)
इंग्लंड – 498/4 विरुद्ध नेदरलँड्स (2022)
सरे – 496/4 विरुद्ध ग्लुसेस्टरशायर (2007)
इंग्लंड – 481/6 विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2018)
भारत अ – 458/4 विरुद्ध लिसेस्टरशायर
दरम्यान, तामिळनाडूसाठी त्यांचा सलामीवीर नारायण जगदीशन (Narayan Jagadeesan) फलंदाज विजय हजारेच्या चालू हंगामात वादळी खेळी करत आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्धही त्याने हाच फॉर्म कायम राखला. नारायण जगदीशनने या सामन्यात नाबाद 277 धावा कुटल्या. लिस्ट ए क्रिकेमध्ये एखाद्या फलंदाजीने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम सरे संघासाठी खेळणाऱ्या एलिस्टर ब्राउन याने 2002 मध्ये केला होता. ब्राऊनच्या नावार लिस्ट एस क्रिकेटमध्ये 268 धावांची खेळी नोंदवली गेली होती. आता ब्राऊन यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने श्रीलंका संघासोबत खेळताना 2014 मध्ये 264 धावांची खेळी केली होती. (Tamil Nadu score Highest total in List A in match against Arunachal Pradesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एन जगदीसनचा वनडे क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; विराट कोहली, कुमार संगकाराला टाकले मागे
आयसीसी स्पर्धांमध्ये सलग 3 वेळेस फायनलचे तिकीट मिळवणारे कर्णधार, एकमेव भारतीयाचा समावेश