प्रो कबड्डी सीजन ७ अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. आता जयपूर लेग सुरू असून त्यानंतर शेवटचे दोन महत्वपूर्ण लेग बाकी आहेत. जयपूर लेग नतंर पंचकुला (हरियाना स्टिलर्स) आणि नोएडा (यूपी योद्धा) हे दोन लेग होतील. त्यानंतर अहमदाबाद येथे प्ले-ऑफचे सामने होतील.
आतापर्यंत झालेल्या १०५ सामन्यानंतर दबंग दिल्ली व बंगाल वॉरियर्स यांनी प्ले-ऑफसाठी आपले स्थान पक्के केले आहे. तर सर्वात अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला तामिळ थालवाजचा संघ मात्र खराब कामगिरीनंतर प्ले-ऑफचया शर्यतीतून बाहेर पडला आहे.
त्यामुळे आता प्ले-ऑफच्या उर्वरित ४ जागांसाठी आता ९ संघात स्पर्धा बघायला मिळेल.
दबंग दिल्ली व बंगाल वॉरियर्स दोन्ही संघानी प्ले-ऑफ मध्ये प्रवेश मिळवला असला तरी त्याना पहिल्या दोन क्रमांकावर स्थान टिकवण्यासाठी उर्वरित सामने ही महत्वाचे असणार आहेत. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानवर असलेले संघ थेट सेमी फायनलसाठी पात्र ठरणार आहेत.
प्रो कबड्डी सीजन ७ मधील खेळाडुंकडे बघता तामिळ थालवाजच्या संघात सर्वात अनुभवी खेळाडू होते. तमिळ संघात अजय ठाकूर, राहुल चौधरी, मनजीत चिल्लर, मोहित चिल्लर, शब्बीर बापू, रन सिंग हे दिगग्ज संघात होते. पण असे असतानाही तमिळच्या संघावर प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वातआधी बाहेर पडण्याची नामुष्की ओलावली आहे.
तसेच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी शर्यतीत असलेल्या संघांपैकी हरियाना स्टीलर्सने किमान १ विजय आणि १ सामना बरोबरीत रोखला तरी त्यांच्यासाठी प्ले ऑफचे दरवाजे खुले होतील. तर यु मुंबा, बेंगळुरू बुल्स आणि युपी योद्धा यांना उर्वरित सामान्यापैकी किमान २-३ विजय आवश्यक आहेत.
जयपूर पिंक पँथर्स, पुणेरी पलटण, पाटणा पायरेट्स, गुजरात फॉर्च्यून जायंट्स आणि तेलुगु टायटन्सला यांना उर्वरित सर्व सामने जिंकण्याबरोबरच इतर संघाच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे या संघांसाठी प्ले-ऑफचा प्रवास खडतर असेल. तरी ४ जागांसाठी ९ संघात चुरशीचे सामने बघायला मिळतील अशी आशा आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुंबई शहराचे कबड्डी पंच शिबीर अलिबाग येथे संपन्न
–परदीप नरवालने तिसऱ्यांदा हे खास द्विशतक पूर्ण करत रचला इतिहास