बांगलादेशचा फलंदाज तमीम इकबाल बांगलादेशच्या वनडे संघाचा नवीन कर्णधार बनवण्यात आहे. त्यामुळे तो आता मश्रफे मोर्तझाची जागा घेणार आहे. मोर्तझाने काही दिवसांपूर्वी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
विशेष म्हणजे मोर्तझा (Mashrafe Mortaza) आणि बांगलादेशचा (Bangladesh) माजी कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) या खेळाडूंना बांगलादेश क्रिकेट मंडळाने (Bangladesh Cricket Board) (बीसीबी) वार्षिक कराराच्या यादीतून बाहेर केले आहे. शाकिबवर आयसीसी 2 वर्षांसाठी बंदी घातली आहे.
बांगलादेश संघ यावेळी झिंबाब्वेविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर 1 एप्रिलला बांगलादेश संघ पाकिस्तानविरुद्ध कराची येथे वनडे सामना खेळणार आहे. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिकाही खेळण्यात येणार आहे.
तमीम पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपासून बांगलादेशचे नेतृत्व करेल. बीसीबीचे अध्यक्ष नझमुल हसन (Nazmul Hasan) यांनी दिलेल्या माहितीनुसार, तमीमला दीर्घकाळासाठी कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. तर महमुदुल्लाह रियादला टी20 आणि मोमिनुल हकला कसोटी संघाचा कर्णधार असतील. म्हणजेच 3 क्रिकेट प्रकारासाठी 3 वेगवेगळे कर्णधार असतील.
मोर्तझा आणि शाकिब यांच्याबरोबरच इमरुल कायस, अबु हीदर, सय्यद खालिद अहमद, रूबेल होसेन आणि शादनाम इस्लाम या खेळाडूंना वार्षिक कराराच्या यादीत जागा मिळालेली नाही.
मात्र, नजमुल होसेन शांतो, मोहम्मद मिथुन, इबादत होसेन चौधरी, एफी होसेन धर्बो आणि नईम शेख यांना पहिल्यांदाच वार्षिक कराराच्या यादीत स्थान मिळाले आहे.





