---Advertisement---

विकेटही घेतल्या, शतकही ठोकलं! टीम इंडियाला मिळाला नवा अश्विन?

On: शनिवार, ऑक्टोबर 5, 2024 5:13 PM
---Advertisement---

मुंबईनं 2024 इराणी चषकाचं विजेतेपद पटकावलं आहे. संघानं रेस्ट ऑफ इंडियाविरुद्धचा सामना ड्रॉ केला. मात्र पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईला विजेता घोषित करण्यात आलं.

तनुष कोटियननं या सामन्यात मुंबईसाठी चमकदार कामगिरी केली. त्यानं फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही कमाल केली. तो मुंबईच्या दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यानं नाबाद शतक झळकावलं. तनुषनं 140 चेंडूंचा सामना करत 114 धावा केल्या. त्याच्या या सामन्यातील अष्टपैलू कामगिरीमुळे तो टीम इंडियात रविचंद्रन अश्विनची जागा घेऊ शकतो, असं बोललं जात आहे.

टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू अश्विननं अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं कसोटीमध्ये गोलंदाजीसोबतच फलंदाजीमध्येही धमाकेदार कामगिरी केलं. अश्विननं नुकत्याच बांगलादेशविरुद्धच्या कसोटीमध्ये शतक झळकावलं होतं. आता तनुष कोटियन या मार्गानं वाटचाल करत आहे. इराणी चषक स्पर्धेत त्यानं मुंबईसाठी अष्टपैलू कामगिरी केली.

मुंबईनं दुसऱ्या डावात 8 गडी गमावून 329 धावा केल्या. यादरम्यान तनुषनं 150 चेंडूंचा सामना करत नाबाद 114 धावा केल्या. त्यानं 10 चौकार आणि 1 षटकार मारला. तनुषनं फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही कमाल दाखवली. त्यानं रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध 27 षटकांत 101 धावा देऊन 3 बळी घेतले. यासोबतच त्यानं 2 मेडन षटकंही टाकली.

तनुष कोटियननं आतापर्यंत 30 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यानं 88 विकेट्स घेतल्या. याशिवाय त्यानं 1451 धावाही केल्या आहेत. तनुषनं 2 शतकं आणि 13 अर्धशतके ठोकली आहेत. नाबाद 120 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तनुषनं 19 लिस्ट ए सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत. त्यानं 24 देशांतर्गत टी20 सामन्यात 24 बळी घेतले आहेत.

तनुषबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या खूपच तरुण आहे. त्यानं सातत्यानं चांगली कामगिरी केली, तर तो टीम इंडियात स्थान मिळवू शकतो. रविचंद्रन अश्विन सध्या त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत कोटियन त्याचा चांगला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो.

हेही वाचा –

हार्दिक पांड्या बनू शकतो भारताचा टॉप टी20 गोलंदाज, भुवनेश्वर कुमारचा मोठा विक्रम धोक्यात
भारतीय दिग्गजाच्या मुलाची पदार्पणातच शानदार खेळी, अवघ्या 26 षटकांत जिंकवला सामना
टी20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---