इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरु होत आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. यावर्षी आयपीएलमध्ये ८ नव्हे तर १० संघ खेळताना दिसणार आहेत. यामुळे आयपीएलचे स्वरूप बदलण्यात आले असून १० संघांचे दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. आयपीएलचे सर्व सामने पुणे आणि मुंबईमध्ये खेळले जाणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना २९ मे ला पार पडणार आहे. दरम्यान या लेखात आपण अशा अँकरबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या या आयपीएलमध्ये दिसणार आहेत.
https://www.instagram.com/p/CbQe3-7P7q2/?utm_source=ig_web_copy_link
१. संजना गणेशन
संजनाची गणेशन भारतातील प्रमुख अँकरपैकी एक आहे. संजना सध्या महिला विश्वचषकात अँकरिंग करत आहे. संजना आयपीएलमध्ये मुख्य अँकरच्या भूमिकेतही दिसणार आहे. तिने यापूर्वी आयपीएलमध्ये अँकरिंग केले आहे आणि तिच्या कामाचे कौतुकही केले गेले आहे. ती या आयपीएलमध्येही कायम राहील याची खात्री आहे. संजनाने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत लग्न केले आहे.
https://www.instagram.com/p/CUrgYDhIGmv/?utm_source=ig_web_copy_link
२. नशप्रीत कौर
आयपीएलच्या या ग्लॅमरस अँकरचा जन्म भारतात झाला नाही. तीने तिचे शिक्षण मेलबर्नमध्ये पूर्ण केले आहे. तीने अनेक क्रिकेट शोमध्ये अँकरिंग केले आहे. तसेच आयपीएल २०२० मध्ये डाव आणि सामना संपल्यानंतर अँकरिंग केले आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएलमधील तीच्या कामाचे कौतुक झाले होते.
https://www.instagram.com/p/CaEYjh3MKAD/?utm_source=ig_web_copy_link
३. तान्या पुरोहित
मूळची उत्तराखंडची असलेल्या तान्याने गढवाल विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. अनुष्का शर्माच्या एका चित्रपटातून तीला लोकप्रियता मिळाली. यानंतर तीला बॉलिवूड आणि अनेक क्रिकेट शो होस्ट करण्याच्या ऑफर येत आहेत. आयपीएल अँकरच्या यादीत तीचाही समावेश आहे.
https://www.instagram.com/p/CVFQ88DB2Nz/?utm_source=ig_web_copy_link
४. नेरोली मिडोस
नेरोली मूळची ऑस्ट्रेलियाची आहे. तीने फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्येही अँकरिंग केली आहे. ती ऑस्ट्रेलियन पत्रकार आहे. तिने आयपीएल २०२१ मध्ये अँकरिंग देखील केले होते आणि या हंगामात देखील ती माईक घेऊन मैदानात दिसू शकते.
https://www.instagram.com/p/CCgwY3AJNVP/?utm_source=ig_web_copy_link
५. मयंती लँगर
भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये हे नाव नवीन नाही. मयंती लँगर आई झाल्यापासून अँकरिंग करत नाहीये. तीने काही काळ कामातून ब्रेक घेतला आहे. या आयपीएलमध्येही ती दिसण्याची शक्यता कमी आहे. याच कारणामुळे स्टार स्पोर्ट्सच्या अँकरच्या सुरुवातीच्या यादीतही तिचे नाव नाही. श्रीलंका आणि भारत यांच्यातील सामना पाहण्यासाठी मयंती बेंगळुरूला पोहोचली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: अन् कॅमेराला पाहून चालू सामन्यात चिडला स्टीव्ह स्मिथ, पाहा नक्की झालं तरी काय
स्टीव्ह स्मिथचा सचिन-संगकाराच्या विश्वविक्रमांना ‘दे धक्का’! १५० कसोटी डावांत मोठे पराक्रम नावावर
पंजाब किंग्जमधून वेगळे होण्याच्या निर्णयावर केएल राहुलचे स्पष्टीकरण, संघ सोडण्यामागचे सांगितले कारण






