टी२० विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. पाकिस्तानने भारत आणि नंतर न्यूझीलंडला सहज हरवून उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात जिथे डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी चमकला. तिथे दुसऱ्या सामन्यात हॅरिस रौफने न्यूझीलंड संघाची वाताहत केली. या सामन्यात रौफने २२ धावांत ४ बळी घेतले. यामध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलला बाद केलेला चेंडू खास होता. कारण, ‘टेप बॉल’ क्रिकेटमध्ये शिकलेल्या हुशारीने रौफला हा बळी मिळाला.
गप्टीलची उडवली दांडी
हॅरिस रौफने पहिला चेंडू गप्टिलला १४९ किमी प्रतितास वेगाने यॉर्कर टाकला. रौफचा हा यॉर्कर थेट गप्टिलच्या पायाच्या बोटाला लागला आणि तो वेदनेने विव्हळू लागला. रौफने पुढे एक लेन्थ चेंडू टाकतो. त्याचा वेगही १४८ किमी प्रति तास होता. गप्टिल या चेंडूवर आपली बॅट खाली आणेपर्यंत चेंडू थाई पॅडला लागला आणि स्टंपवर आदळला.
टेप बॉलने खेळला आहे क्रिकेट
हॅरिस रौफ रावळपिंडीतील एका दुकानात सेल्समन म्हणून काम करत असताना टेप बॉल क्रिकेट खेळत असे. यादरम्यान, एकदा पीएसएल संघ लाहोर कलंदरच्या चाचणीसाठी गेला होता. त्याच्या वेगाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज आकिब जावेदची नजर त्याच्यावर पडली आणि त्यानंतर हॅरिसची कारकीर्दच बदलून गेली. टेप बॉल क्रिकेटच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलेला तो एकटाच नाही.
भारताचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती यानेही स्ट्रीट क्रिकेट ते भारतीय असा प्रवास केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक होती. याच कारणामुळे टेप बॉल क्रिकेटमधून आलेल्या या युवा खेळाडूला टीकेला सामोरे जावे लागले. पाकिस्तानात टेप बॉल क्रिकेट रस्त्यावर खेळले जाते, असे म्हणत पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने वरूण चक्रवर्तीची खिल्ली उडवली होती.
काय असतो टेप बॉल
टी२० विश्वचषकात पाकिस्तानी गोलंदाजांच्या यशानंतर टेप बॉल क्रिकेट अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. वास्तविक, टेप बॉल एक टेनिस बॉल आहे, जो इलेक्ट्रिकल टेपमध्ये गुंडाळलेला असतो. चेंडू अधिक गुळगुळीत करण्यासाठी हे केले जाते. टेप लावल्यानंतरही हा चेंडू पारंपारिक लेदर बॉलपेक्षा हलका होतो. शाहीन आफ्रिदी, वसीम अक्रम आणि आकिब जावेद हे तिघेही पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्ये असेच क्रिकेट खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविड टीम इंडियाचे २६ वे महागुरू, आतापर्यंत ‘या’ दिग्गजांची लागलीय वर्णी; वाचा संपूर्ण यादी