आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी (४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यामुळे बांगलादेश संघाचा डाव अवघ्या ७३ धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. तर बांगलादेश संघाला एकही विजय मिळवता आला नाही. दरम्यान या सामन्यात बांगलादेश संघाची गोलंदाजी सुरू असताना असा काहीसा आगळा वेगळा प्रकार घडला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे खूप कमी वेळेस पाहायला मिळाले आहे, ज्यामध्ये आपल्याच संघातील खेळाडू संघ सहकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना दिसून आला आहे. असाच धक्कादायक प्रकार ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यात बांगलादेश संघाचा खेळाडू सौम्य सरकारकडून क्षेत्ररक्षण करताना एक चूक झाली होती, ज्यामुळे वेगवान गोलंदाज तस्किन अहमद संताप व्यक्त करताना दिसून आला.
तर झाले असे की, डावातील तिसरे षटक सुरू असताना तस्किन अहमद गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर आरोन फिंचने मिड विकेटच्या दिशेने शॉट मारला, जो क्षेत्ररक्षण करत असलेल्या सौम्य सरकारच्या हातात गेला. परंतु सौम्य सरकारला हा झेल टिपता आला नाही. हा झेल सुटल्यानंतर गोलंदाज तस्किन अहमद शिवीगाळ करताना दिसून आला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CV2nRmIlZJP/?utm_medium=copy_link
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर बांगलादेश संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शमीम होसेनने सर्वाधिक १९ तर मोहम्मद नईमने १७ धावांची खेळी केली. बांगलादेश संघाचा डाव अवघ्या ७३ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून आरोन फिंचने सर्वाधिक ४० तर डेविड वॉर्नरने १८ धावांचे योगदान दिले. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या-
नामिबियाला धूळ चारत सेमीफायनलचा मार्ग सोपा करण्यावर न्यूझीलंडची नजर, पराभूत झाल्यास भारताचा फायदा
मॅथ्यू वेडच्या हातून झेल सुटला अन् हुकली ऍडम झम्पाची हॅट्रिक, दोघांमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल
स्कॉटलँडविरुद्ध भारताला ‘मोठ्या विजया’ची गरज, माजी क्रिकेटरने संघ निवडीबाबत दिला ‘हा’ सल्ला