भारताचा दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी हा एक यशस्वी कर्णधार, उत्कृष्ट फलंदाज आणि दमदार यष्टीरक्षकदेखील आहे. बऱ्याचदा आपल्याला धोनीच्या यष्टीरक्षणाचे गुणगाण सर्वत्र ऐकायला मिळते. परंतु, असे खूप कमी वेळा दिसून येते की, एक यष्टीरक्षक दुसऱ्या यष्टीरक्षकाची प्रशंसा करत असेल, पण असे घडले आहे. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ततेंदा तैबूने धोनीची भरभरुन प्रशंसा केली आहे- Tatenda Taibu Admires MS Dhoni and Tell His Specialty
ततेंदा तैबू म्हणाला की, “माही (धोनी) जगातील सर्वात मजबूत मानसिकता असणारा खेळाडू आहे. तो तांत्रिकदृष्ट्या जास्त प्रबळ नसूनही खूप यशस्वी आहे. यामागे त्याची मानसिक मजबूती हेच एकमेव कारण आहे.”
धोनी पडला कार्तिकवर भारी
ततेंदा तैबूने धोनी आणि दिनेश कार्तिकला प्रथम तेव्हा पाहिले होते, जेव्हा ते दोघेही भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी भारत अ संघामध्ये संघर्ष करत होते. याविषयी बोलताना ततेंदा तैबू म्हणाला की, “ते दोघेही भारत अ संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मला कार्तिकचा खेळ धोनीपेक्षा जास्त नैसर्गिक वाटला होता. परंतु, धोनीने खूप मेहनत करुन स्वत:ला तयार केले आहे. तो मानसिकदृष्ट्या आपल्या संघातील सर्व क्रिकेटपटूंपेक्षा जास्त मजबूत आहे. त्याच्या याच गुणामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आहे.”
सर्व यष्टीरक्षकांपेक्षा वेगळे आहे धोनीचे तंत्र
धोनीच्या यष्टीरक्षणाच्या तांत्रिक क्षमतेविषयी बोलताना तैबू म्हणाला, “धोनीचे यष्टीरक्षणाचे तंत्र सर्वांपेक्षा वेगळे होते. सहसा सर्व यष्टीरक्षक यष्टीमागे उभे होताना आपल्या हाताची बोटे एकत्र करतात. परंतु, धोनी याउलट त्याचा हात खुला ठेवतो. तरीही तो अचूक झेल पकडतो आणि वेगाने चेंडू पकडत फलंदाजांना यष्टीचीत करतो.”
दबावामुळे आपले तंत्र बदलणाऱ्या यष्टीरक्षकांसाठी उत्तम उदाहरण
तैबूला वाटते की, “सर्व क्रिकेटपटूंचा नैसर्गिक खेळच चांगला असतो. यष्टीरक्षणाप्रमाणेच धोनीची फलंदाजी शैलीही सर्वांपेक्षा हटके होती. त्याचा डोळे, डोके आणि हातांचा ताळमेळ अनोखा होता. याबरोबरच तो मानसिकदृष्ठ्या प्रबळ असल्यामुळे आहे म्हणून एवढा यशस्वी आहे. जर, तुमची शैली वेगळी इतरांपेक्षा वेगळी असेल तर प्रशिक्षक त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, धोनीच्या आकडेवारींनी सर्वांना चुकीचे सिद्ध केले आहे.”
धोनीने त्याच्या वनडे कारकिर्दीत ३५० सामन्यात १०७७३ धावा केल्या आहेत. तर, यष्टीमागे ४४४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, कसोटीत ९० सामन्यात ४८७६ धावा केल्या आहेत आणि यष्टीमागे २९४ विकेट्स घेतल्या आहेत.
का तैबूचे वक्तव्य आहे एवढे महत्त्वाचे?
झिम्बाब्वेच्या अशांत परिस्थितीला पाहता तैबूला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु, १७व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तैबू १९व्या वर्षी संघाचा उपकर्णधार आणि २०व्या वर्षी कर्णधार बनला. यासह क्रिकेटविश्वात सर्वात कमी वयात कर्णधार बनण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होता. हा विक्रम अफघानिस्तानचा कर्णधार राशिद खानने मोडला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
दररोज थोडा वेळ स्वत:साठी काढत अजिंक्य रहाणे करतोय हे महत्त्वाचं काम
आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार टीम इंडिया? पहा काय झाला निर्णय
सचिनबद्दल ‘असा’ निर्णय घेणे अझहरला पडले होते भलतेच महागात