---Advertisement---

भारताने जिथे विश्वचषक जिंकला, त्याच वानखेडे स्टेडियमचे तौक्ते वादळाने केले हाल; पाहा व्हायरल फोटो

On: मंगळवार, मे 18, 2021 11:34 AM
---Advertisement---

सध्या महाराष्ट्रावर तौक्ते चक्रीवादळ घोंघावत आहे. या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील बऱ्याचशा मोठ्या शहरांना बसला आहे. त्यातही अरबी समुद्रालगत वसलेल्या महाराष्ट्राची राजधानी, मुंबई शहरात या वादळाचे रौद्र रुप पाहायला मिळाले आहे. मुंबई शहरातील अनेक ठिकाणी झाडे पडून, इमारतींची पडझड झाली आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या वानखेडे स्टेडियमलाही तौक्ते वादळाचा फटका बसला आहे. या वादळात स्टेडियमधील एक स्टँड कोसळले असून एका साईट स्क्रिनचेही नुकसान झाले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला यासंदर्भात माहिती दिली आहे. “वानखेडे स्टेडियममधील स्टेडियममधील एक स्टँड जमिनिवर कोसळले आहे. तसेच उत्तर दिशेला असलेली १६ फूट ऊंच साईट स्क्रिन जमीनदोस्त झाली आहे. यापुर्वी २०११ सालच्या विश्वचषकावेळीसुद्धा ही साईट स्क्रिन पडली होती. त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही. आम्ही लवकरच पुन्हा ती साईट स्क्रिन उभारु,” असे त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

वानखेडे स्टेडियममध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अनेकांनी वानखेडे स्टेडियमची दुरावस्था झाल्याचे पाहून नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी प्रतिक्रियांद्वारे त्यांचे दु:ख व्यक्त केले आहे.

खास बाब अशी की, वानखेडे स्टेडियमशी भारतीय संघाचे खूप जवळचे नाते राहिले आहे. याच मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला होता. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने वानखेडे स्टेडियमवर २०११ सालचा विश्वचषक अंतिम सामना खेळला होता. श्रीलंकाविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते. तब्बल ३२ वर्षांनंतर भारताला हा पराक्रम करता आला होता. तत्पुर्वी १९८३ साली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक पटकावला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा टी२० विश्वचषक खेळण्यापासून राहू शकतो वंचित, जाणून घ्या कारण

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी टीम इंडियाला दिलासा, ‘हा’ प्रमुख खेळाडू सुटला कोरोनाच्या तावडीतून

५ असे क्रिकेटपटू ज्यांचे संघातच होते मोठे दुश्मन, दोन जोड्या आहेत भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---