आयपीएल २०२१ मधील अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑगस्ट) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात सीएसकेने २७ धावांनी विजयी पताका फडकवली. या विजयासह सीएसकेने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या विजयाचा शिल्पकार फाफ डू प्लेसिस ठरला. फाफला (५९ चेंडूत ८६ धावा) सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआरने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच सीएसकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने निर्धारित २० षटकात ३ विकेट्स गमावत १९२ धावा केल्या होत्या. सीएसकेने दिलेल्या १९३ धावांचे आव्हान पूर्ण करण्यात केकेआर संघ अपयशी ठरला. त्यांनी निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत केवळ १६५ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे त्यांना पराभव स्वीकारत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आयपीएल इतिहासातील सीएसकेच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर सीएसकेने आतापर्यंत ४ वेळा आयपीएलचे विजेतेपदक पटकावले आहे. त्याचबरोबर त्यांनी एकूण ११ वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. यादरम्यान त्यांनी ९ वेळा अंतिम सामना खेळला आहे. (Chennai Super Kings in IPL history)
आयपीएल इतिहासातील सीएसकेची कामगिरी
२००८- उपविजेते
२००९- चौथ्या स्थानी
२०१०- विजेते
२०११- विजेते
२०१२- उपविजेते
२०१३- उपविजेते
२०१४- तिसऱ्या स्थानी
२०१५- उपविजेते
२०१८- विजेते
२०१९- उपविजेते
२०२०- सातव्या स्थानी
२०२१- विजेते*
हेही वाचा-
-चेन्नईने जिंकले चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद! पाहा आजपर्यंतचे विजेते संघ
-भारीच ना! आयपीएल २०२१ला मिळाला नवा ‘पर्पल कॅप’ विजेता; ‘हे’ आहेत सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ गोलंदाज
-राडाच ना! आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारे विस्फोटक फलंदाज; ऋतुराज ठरला चेन्नईचा तिसरा खेळाडू
-आमचा नाद करायचा न्हाय! आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणारे गोलंदाज; ‘या’ भारतीयाने पटकावल्यात दोनदा