fbpx
Thursday, February 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

जो रूटच्या नेतृत्वात इंग्लंड संघ आगामी दौऱ्यासाठी भारतात दाखल झाला.

January 27, 2021
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/@englandcricket

Photo Courtesy: Twitter/@englandcricket


श्रीलंकेच्या यशस्वी दौर्यानंतर इंग्लंड संघाचे खेळाडू आज (२७ जानेवारी) भारतात दाखल झाले. कर्णधार जो रूटसमवेत श्रीलंकेविरूद्ध कसोटी मालिकेत खेळलेले सर्व खेळाडू चेन्नईला पोहोचले. दोन्ही देशांमधील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नई येथे खेळले जातील. श्रीलंका दौऱ्यावर न गेलेले इंग्लंडचे खेळाडू यापूर्वीच येथे दाखल झाले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरुवात होईल. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने सहा गडी राखून विजय मिळविला. त्याचबरोबर इंग्लंडने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची कामगिरी केली. भारतात दाखल झालेले खेळाडू पुढील सहा दिवस विलिनीकरणात राहतील. यानंतर, त्यांना सरावासाठी परवानगी देण्यात येईल.

असे झाले चेन्नईत स्वागत

श्रीलंकेमार्गे भारतात दाखल झालेल्या इंग्लंड संघाचे चेन्नई येथे हॉटेल कर्मचाऱ्यांनी नम्रतेने हात जोडत स्वागत केले. कोरोना आजारामुळे कर्मचाऱ्यांना खेळाडूंच्या संपर्कात येण्यास मज्जाव केला गेला आहे. इंग्लिश खेळाडूंच्या स्वागताचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटरवरून सार्वजनिक केला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हा व्हिडिओ शेअर करत आगामी मालिकेसंबंधी माहिती दिली.

📍 Chennai, India@root66 and the team have arrived in India ahead of our four-match Test series 🇮🇳🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 pic.twitter.com/GT06p9Ru4u

— England Cricket (@englandcricket) January 27, 2021

प्रमुख खेळाडू दाखल झाले चेन्नईमध्ये

श्रीलंका दौऱ्यावर न गेलेले बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर व रॉरी बर्न्स हे इंग्लिश खेळाडू मागील आठवड्यातच चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत. या खेळाडूंचा सध्या विलगीकरण कालावधी सुरू आहे. भारतीय संघात खेळत असलेले मुंबईकर खेळाडू देखील चेन्नईत पोहोचल्याचे कळतेय. यामध्ये भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, सलामीवीर रोहित शर्मा व अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. हे खेळाडू मंगळवारी उशिरा चेन्नईत दाखल झाले होते.

महत्वाच्या बातम्या:

आयसीसी वनडे क्रमवारी : विराट-रोहितचे वर्चस्व अबाधित, बुमराह देखील या स्थानी कायम

वेस्ट इंडीजच्या दोन खेळाडूंचे कोरोना अहवाल आले पॉझिटिव्ह, मुकणार या स्पर्धेला

IND vs ENG : रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे चेन्नईत दाखल, इतके दिवसांसाठी असतील क्वारंटाईन


Previous Post

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

Next Post

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

Related Posts

Photo Courtesy:Twitter/ICC
इंग्लंडचा भारत दौरा

INDvENG 3rd Test Live: भारताला जबर फटका; रोहित पाठोपाठ पंतही बाद; ४४ ओव्हरमध्ये भारताच्या ६ बाद १२१ धावा

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

शतक हुकलं पण बनला नवा ‘सिक्सर किंग’, रोहित शर्मालाही सोडलं पिछाडीवर

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI/ANI
इंग्लंडचा भारत दौरा

मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव; राहुल गांधी निशाणा साधत म्हणतात, ‘सत्य आपोआप समोर येते’

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

दु:खद! ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला झाला पितृशोक, कॅन्सरमुळे वडीलांचे निधन

February 25, 2021
Photo Courtesy: Screengrab/@spiderverse17
इंग्लंडचा भारत दौरा

Video: पंत काय करेल याचा नेम नाही! रिषभच्या यष्टीमागील कृत्यामुळे घाबरला इंग्लिश फलंदाज अन् केलं असं काही

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI/AmitShah
इंग्लंडचा भारत दौरा

“पुजाराने द्विशतक झळकावत टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकून द्यावी,” गृहमंत्रींनी व्यक्त केली इच्छा

February 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

Photo Courtesy: Twitter/@KKRiders

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.