India Cricket Schedule 2025: टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यात व्यस्त आहे. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना 30 डिसेंबरला संपणार आहे. या सामन्यासह टीम इंडियासाठी 2024 वर्ष संपणार आहे. यानंतर टीम इंडिया नवीन वर्षाच्या निमित्ताने 3 जानेवारीपासून कसोटी मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर मर्यादित षटकांच्या मालिकेत टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंड संघ जानेवारी 2025 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंडचा संघ यजमान भारताविरुद्ध 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. यानंतर, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होईल जी हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळली जाईल.
2025 मधील टीम इंडियाचे वेळापत्रक…
इंग्लंडचा भारत दौरा (22 जानेवारी ते 12 फेब्रुवारी, 5 टी20 आणि 3 वनडे)
भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी20: 22 जानेवारी 2025, कोलकाता
भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरी टी20: 25 जानेवारी 2025, चेन्नई
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी20: 28 जानेवारी 2025, राजकोट
भारत विरुद्ध इंग्लंड, चौथा टी20: 31 जानेवारी 2025, पुणे
भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवा टी20: 02 फेब्रुवारी 2025, मुंबई
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला एकदिवसीय: 06 फेब्रुवारी 2025, नागपूर
भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरी वनडे: 09 फेब्रुवारी 2025, कटक
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरी वनडे: 12 फेब्रुवारी 2025, अहमदाबाद
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: 19 फेब्रुवारी – 9 मार्च 2025 (पाकिस्तान आणि तटस्थ ठिकाणे)
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025: 14 मार्च – 25 मे 2025
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल: 11-15 जून 2025
भारताचा इंग्लंड दौरा (5 कसोटी सामने)
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
भारत विरुद्ध इंग्लंड, पहिली कसोटी: 20-24 जून 2025
भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरी कसोटी: 2-6 जुलै 2025
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरी कसोटी: 10-14 जुलै 2025
भारत विरुद्ध इंग्लंड, चौथी कसोटी: 23-27 जुलै 2025
भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवी कसोटी: 31-04 ऑगस्ट 2025
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूवर आयसीसीची कारवाई, एक चूक पडली महागात
एमसीए अधिकाऱ्याच्या टीकेला पृथ्वी शॉचं उत्तर, इंस्टा स्टोरी टाकून केला पलटवार
भारताला मिळाली ‘लेडी झहीर खान’! मास्टर ब्लास्टरने शेअर केला बॉलिंगचा भन्नाट व्हिडिओ