---Advertisement---

जे कोणालाच जमलं नाही, ते टीम इंडियाने करून दाखवलं; नावावर केला मोठा विक्रम!

On: शुक्रवार, मार्च 6, 2026 7:40 PM
---Advertisement---

भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत उपांत्य फेरीच्या (सेमीफायनल) सामन्यात ७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. टीम इंडियाने या सामन्यात अनेक मोठे आणि अद्भूत विक्रम आपल्या नावावर केले आहेत, परंतु एक विक्रम असा होता जो अत्यंत थक्क करणारा होता.

क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाव्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. टीम इंडियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २५३ धावांचा डोंगर उभा केला होता, तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ २४६ धावाच करू शकला. याचसोबत टीम इंडियाने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात विक्रमी चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. २००७ मध्ये पहिल्यांदा, २०१४ मध्ये दुसऱ्यांदा, २०२४ मध्ये तिसऱ्यांदा आणि आता २०२६ मध्ये चौथ्यांदा टीम इंडियाने अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---