---Advertisement---

KKR vs PBKS: वरुण चक्रवर्ती-सुनील नरेन पंजाबविरुद्धचा सामना का खेळत नाहीयेत? कर्णधार रहाणेने सांगितलं नेमकं कारण

On: सोमवार, एप्रिल 6, 2026 8:02 PM
---Advertisement---

आयपीएल (IPL) 2026 मध्ये 6 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी केकेआरला मोठा धक्का बसला असून संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाले आहेत. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉसच्या वेळी सांगितले की, वरुण चक्रवर्ती (Varun Chakrawarthy & Sunil Naren) आणि सुनील नरेन या सामन्यात खेळत नाहीत. दुखापत आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे या दोघांनाही बाहेर बसावे लागले आहे.

टॉसच्या वेळी बोलताना कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, या सामन्यासाठी आम्ही संघात दोन बदल केले आहेत आणि हे दोन्ही बदल आम्हाला नाईलाजास्तव करावे लागले आहेत. वरुण चक्रवर्ती गेल्या सामन्यात झेल घेताना दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे तो आजचा सामना खेळू शकत नाही. तसेच सुनील नरेनची प्रकृती ठीक नसल्यामुळे (आजारपणामुळे) तो या सामन्यात खेळत नाहीये. त्यांच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून रोवमन पॉवेल आणि नवदीप सैनी यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर रहाणे म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण खेळपट्टी चांगली दिसत आहे, थोडी कोरडी आहे पण फलंदाजीसाठी उत्तम आहे. यावर गवतही कमी आहे. सामना जिंकण्याच्या विश्वासावर तो म्हणाला, सर्व काही आत्मविश्वासावर अवलंबून असते. आम्ही सर्वांनी खूप चांगली तयारी केली आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये लहान-लहान क्षण जिंकणे महत्त्वाचे असते. आम्ही एक संघ म्हणून आत्मविश्वासाने भरलेले आहोत आणि आम्हाला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---