टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला, ज्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच बनला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 9 जुलैला रात्री ट्वीट करून याची घोषणा केली.
गौतम गंभीर भारतीय संघाचा 25वा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्या पूर्वी 24 मुख्य प्रशिक्षकांनी टीम इंडियाची जबाबदारी सांभाळली आहे. यापैकी 21 मुख्य प्रशिक्षक भारतीय होते, तर केवळ 4 विदेशी प्रशिक्षकांनी भारतीय संघाची धुरा सांभाळली आहे. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला टीम इंडियाच्या या सर्व मुख्य प्रशिक्षकांची नावं आणि त्यांच्या कार्यकाळाबद्दल माहिती देतो.
1) केकी तारापोर (1971) – भारत
2) हेमू अधिकारी (1971-74) – भारत
3) गुलाबराय रामचंद (1975) – भारत
4) दत्ता गायकवाड (1978) – भारत
5) सलीम दुरानी (1980-81) – भारत
6) अशोक मांकड (1982) – भारत
7) पीआर मान सिंह (1983-87) – भारत
8) चंदू बोर्डे (1988) – भारत
9) बिशन सिंह बेदी (1990-91) – भारत
10) अब्बास अली बेग (1991-92) – भारत
11) अजित वाडेकर (1992-96) – भारत
12) संदीप पाटील (1996) – भारत
13) मदन लाल (1996-97) – भारत
14) अंशुमन गायकवाड (1997-99) – भारत
15) कपिल देव -(1999-2000) – भारत
16) जॉन राइट (2000-05) – न्यूझीलंड
17) ग्रेग चॅपेल (2000-05) – ऑस्ट्रेलिया
18) रवी शास्त्री (प्रभारी 2007) – भारत
19) लालचंद राजपूत (2007-08) – भारत
20) गॅरी कस्टर्न (2008-11) – दक्षिण आफ्रिका
21) डंकन फ्लेचर (2011-15) – झिम्बाब्वे
रवी शास्त्री (टीम डायरेक्टर 2014-16) – भारत
22) संजय बांगर (प्रभारी 2016) – भारत
23) अनिल कुंबळे (2016-17) – भारत
संजय बांगर (प्रभारी 2017) – भारत
रवी शास्त्री (2017-21) – भारत
24) राहुल द्रविड (2021-24) – भारत
25 गौतम गंभीर (2024) – भारत
महत्त्वाच्या बातम्या –
द्रविडने संघाला बनवले टी20 चॅम्पियन, नवे प्रशिक्षक गौतम गंभीरसमोर आता हे 5 मोठे आव्हान
मोठ्या मनाचा द्रविडः सगळ्यांना सारखे पैसे द्या नाहीतर मलाही…..
गौतम गंभीरच्या पहिल्या दौऱ्यावर वरिष्ठ खेळाडू बाहेर, वनडेतही रोहित-विराट नसतील! मोठे कारण उघड?