---Advertisement---

आता तयारी मालिकेत विजयी आघाडीची! दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाचा जोरदार सराव, पाहा व्हिडिओ

Team India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची असून कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ११३ जिंकला असून आता दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे.

बीसीसीआयने शनिवारी (१ जानेवारी) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, भारतीय खेळाडू नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार सराव करत आहेत. यावेळी काही खेळाडू धावताना दिसत आहेत, तर खेळाडूंनी नेटमध्येही सराव केल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओला बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे की, ‘आम्ही द वॉंडरर्स स्टेडियवर दुसऱ्या कसोटीची तयारी करत आहोत. नवीन वर्ष, नवीन सुरुवात, लक्ष्य जुनेच.’

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमधील द वाँडरर्स स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला सोमवारपासून (३ जानेवारी) सुरुवात होणार आहे.

भारतीय संघाने केले नव्या वर्षाचे स्वागत
भारतीय क्रिकेट संघाने २०२२ वर्षाचे एकत्र स्वागत केले. यावेळी खेळाडूंनी एकत्र वेळ देखील खालवला. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ खेळाडूंनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण, नव्या वर्षाचे स्वागत केल्यानंतर पुन्हा एकदा खेळाडू नव्या जोशात सरावात व्यस्त झाले आहेत.

पहिल्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय
भारताने सेंच्यूरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच मालिकेत १-० फरकाने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे सेंच्यूरियनमध्ये मिळवलेला विजय भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरला. कारण, यापूर्वी कोणत्याच आशियाई संघाने सेंच्यूरियमध्ये कसोटी विजय मिळवला नव्हता. याशिवाय दक्षिण आफ्रिकेतील भारताचा हा चौथाच विजय ठरला.

अधिक वाचा – शानदार… जबरदस्त… जिंदाबाद…! टीम इंडियावर आजी-माजी दिग्गजांकडून पडतोय कौतुकाचा पाऊस

याशिवाय विराट कोहली दक्षिण आफ्रिकेत २ कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी २०१८ साली विराटच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने कसोटी सामना जिंकला होता.

व्हिडिओ पाहा – बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही… | 

या कसोटी मालिकेत जर भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला, तर इतिहास रचला जाणार आहे. कारण, भारतीय संघाला आता दुसरी कसोटी जिंकून विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. तसेच जर असे झाले, तर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘कष्टाचे मिळाले फळ!’ ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यरला टीम इंडियात संधी मिळाल्याने सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा ओघ

भान हरपून नाचायचंय, तर रणवीर सिंग अन् रवी शास्त्रींचा ‘हा’ व्हिडिओ पाहाच, सर्वांचेच वेधलंय लक्ष

नवीन वर्षातील पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याचा पराक्रम केलाय ‘या’ पठ्ठ्याने

बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही... | What is Boxing Day Test? History of Boxing Day

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---