रिंकू सिंहनं ऑगस्ट 2023 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो भारतासाठी टी20 आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळला आहे. मात्र त्याला अजूनही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. आता भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी या डावखुऱ्या फलंदाजाचं कौतुक केलं असून, रिंकू भविष्यात एक मोठा कसोटी क्रिकेटपटू बनू शकतो, असं ते म्हणाले.
विक्रम राठौर म्हणाले, “जेव्हा मी रिंकूला नेटमध्ये फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा मला त्याच्यात अशी कोणतीही कमतरता वाटत नाही की तो कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. जर आपण त्याचे प्रथम श्रेणीतील रेकॉर्ड पाहिले तर त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. तसेच तो स्वभावानं अत्यंत संयमी आहे. संधी मिळाल्यास तो निश्चितच मोठा कसोटी क्रिकेटपटू बनू शकतो.”
रिंकू सिंहला पहिल्यांदा प्रसिद्धी तेव्हा मिळाली, जेव्हा त्यानं आयपीएल 2023 मध्ये यश दयालच्या एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारून केकेआरला संस्मरणीय विजय मिळवून दिला. त्यानंतर रिंकूनं भारतीय संघात एक विस्फोटक फलंदाज म्हणून नाव कमावलं आहे. रिंकूने आतापर्यंत भारतासाठी 20 टी20 सामन्यांमध्ये 83.2 च्या उत्कृष्ट सरासरीनं 416 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 176 पेक्षा जास्त राहिला. रिंकूनं आतापर्यंत केवळ 2 एकदिवसीय सामने खेळले असले तरी त्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 134 एवढा आहे.
असं असलं तरी रिंकूचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील रेकॉर्ड काही औरच सांगतो. त्यानं आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एकूण 47 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 69 डावांमध्ये 54.7 च्या सरासरीनं 3,173 धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लास कारकिर्दीतील त्याचा स्ट्राइक रेट 71.6 एवढा आहे. यावरून दिसून येतं की रिंकू संथ आणि संयमानं देखील खेळू शकतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रिंकून 7 शतकं आणि 20 अर्धशतकं झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याचं जोरदार स्वागत…रस्त्यावर गर्दी मावेना! वडोदऱ्यात भव्य रोड शोचं आयोजन
भारताचा युवा वेगवान गोलंदाज लग्न बंधनात अडकला! पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर
बीसीसीआयचे होणार कोट्यवधींचे नुकसान? ‘या’ कामांवर बंदी आणू शकते भारत सरकार