भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याची गणना जगातील दिग्गज गोलंदाजांमध्ये होते. अश्विनने त्याच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक विक्रम रचले आहेत. नुकतेच वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने आंतरराष्ट्रीय 700 विकेट्सचा टप्पा पार केला होता. त्याच्या का कामगिरीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अशात भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाने अश्विनचे कौतुक केले आहे. त्यांनी अश्विनला भारताचा महान मॅन विनर म्हटले आहे.
आर अश्विन (R Ashwin) याने 131 धावा खर्चून 12 विकेट्स नावावर केल्या होत्या. भारताने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा 1 डाव आणि 141 धावांनी धुव्वा उडवला. अशात भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे (Paras Mhambrey) अश्विनचं कौतुक करत म्हणाले की, “पहिल्या डावात आम्हाला मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे होते, ते आम्ही केले. यामुळे गोलंदाजांना मदत मिळाली. अश्विन आणि जडेजा यांनी कमालीची गोलंदाजी केली.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “ड्रेसिंग रूममध्ये आम्हाला गोलंदाजांच्या प्रदर्शनाचे महत्त्व माहिती आहे. माझ्या मते, अश्विन देशाचा महान मॅच विनरपैकी एक आहे. त्याने आमच्यासाठी अनेक सामने जिंकले आहेत आणि सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे.”
यशस्वीचेही गायले गोडवे
याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 171 धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याचेही त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, “त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली. आपल्या पहिल्याच कसोटीत ज्या खेळपट्टीवर स्ट्रोक्स खेळणेही सोपे नव्हते, त्या कठीण खेळपट्टीवर शतक ठोकणे शानदार होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचीच गरज आहे. वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेणे आणि संघाच्या गरजेनुसार प्रदर्शन करणे. हे पाहून खूपच चांगले वाटले. या प्रदर्शनाने त्याचाही आत्मविश्वास वाढेल.”
पुढे बोलताना म्हाम्ब्रे म्हणाले की, “सुरुवात चांगली राहिली आहे. मला वाटले नव्हते की, इतक्या सहजतेने विजय मिळेल. यामुळे पुढील सामन्यांमध्ये मदत मिळेल.”
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून त्रिनिदाद येथील क्वीन्सपार्क ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात यजमान संघ पुनरागमन करण्याचा, तर भारतीय संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. (team india bowling coach makes big statement about ravichandran ashwin read here)
महत्त्वाच्या बातम्या-
जबरदस्त! सहाव्याच कसोटीत पाकिस्तानच्या नव्या फलंदाजाने रचला इतिहास, एकट्यानेच केला ‘हा’ रेकॉर्ड
वनडे रँकिंगमधील नंबर 1 नॅटचा विक्रमी तडाखा! कांगारूंविरुद्ध Century ठोकत केला मोठा रेकॉर्ड