क्रिकेट विश्वात अनेक गोलंदाज आले आणि गेले, पण असे खूप कमी गोलंदाज होते आणि आहेत, ज्यांनी आपल्या भेदक माऱ्याने फलंदाजांना धडकी भरवण्याचे काम केले. त्यात गोलंदाजांमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजी फळीचा हुकमी एक्का मोहम्मद शमी याच्या नावाचाही समावेश आहे. शमीने नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतही आपला दम दाखवला होता. अशात भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी शमीचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले गोलंदाजी प्रशिक्षक?
भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे (Paras) यांनी मोहम्मद शमी याच्याविषयी बोलताना म्हटले की, चेंडूला सातत्याने योग्य टप्प्यावर टाकण्याची शैली अतुलनीय आहे. त्यांनी शमीला वेगवान गोलंदाज ‘कलाकार’ म्हटले.
माध्यमांशी बोलताना पारस म्हणाले, “जर मी तुम्हाला सांगितले की, शमीसारखा गोलंदाज प्रशिक्षक बनवतो, तर मी खोटं बोलेल. जर कोणत्याही गोलंदाजाने प्रत्येक वेळी वरची सीम पकडून चेंडू योग्य टप्प्यावर टाकला, तर जगातील कोणताही गोलंदाज शमी बनेल.”
पुढे बोलताना ते असेही म्हणाला की, “ही अशी शैली आहे, जी शमीने कठोर मेहनतीने मिळवली आहे आणि स्वत:ला अशाप्रकारचा गोलंदाज म्हणून विकसित केले आहे. सीमवर एकापाठोपाठ एक चेंडू टाकणे आणि त्यात मनगटाची जागा योग्य असणे तसेच चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करणे, ही दुर्मिळ शैली कदाचितच कुणाकडे तरी असते. अनेक गोलंदाज सीमच्या जोरावर चेंडू टाकत असतील, ते पाहतात की, टप्पा पडल्यानंतर त्यांचा चेंडू सरळ जात आहे.”
भारतीय गोलंदाजी प्रशिक्षकांनी अशाप्रकारे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचेही कौतुक केले. ते म्हणाले, “बुमराहलाही आपल्या असामान्य ऍक्शनमुळे चेंडू एकाच जागेवरून आत आणि बाहेर काढायचे माहितीये. ही एक कला आहे. या कलेत पारंगत बनण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत आणि समर्पणाची गरज असते.”
शमीची विश्वचषक 2023मधील कामगिरी
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी मोहम्मद शमी विराजमान झाला होता. त्याने फक्त 7 सामने खेळताना 24 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे, शमी वनडे आणि कसोटी या दोन्ही क्रिकेट प्रकारातील भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. (team india bowling coach paras mhambrey says no coach can create an artist like mohammed shami read)
हेही वाचा-
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे मालिकेतुन बाहेर
BCCI Net Worth: वर्ल्डकप 2023मुळे बीसीसीआयच्या नेटवर्थमध्ये प्रचंड वाढ, ऑस्ट्रेलियापेक्षा 28 पटींनी श्रीमंत