भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. पाच सामन्यांची ही मालिका भारताला मायदेशात खेळायची आहे. या मालिकेत भारतीय संघाकडे पाकिस्तानचा महत्वाचा विक्रम मोडण्याची संधी आहे. जर भारताने मालिकेतील तीन सामने जिंकले, तर संघ दक्षिण आफ्रिकेला सर्वाधिक वेळा पराभूत करण्याच्या बाबतीत पाकिस्तानला मागे टाकेल.
भारतीय संघ (Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या १५ सामन्यांपैकी ९ सामने जिंकले आहेत, तर राहिलेले ६ सामने दक्षिण आफ्रिकी संघाने जिंकले आहेत. या यादीत भारताच्या आधी पाकिस्तान आणि इंग्लंड यांचे नाव आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी ११ टी-२० सामने आफ्रिकी संघाविरुद्ध जिंकले आहेत. यादीत सर्वात पहिले नाव आहे ऑस्ट्रेलियाचे, ज्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक १४ टी-२० सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाची बरोबरी करण्यासाठी भारताला आगामी मालिकेत विरोधी संघाला क्लीन स्वीप द्यावा लागेल.
मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या टी-२० सामन्यांमध्ये भारताचे आकडे निराशाजनक आहेत. भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात ४ टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी एका सामन्यात संघाला विजय मिळाला आहे, तर राहिलेले तिन्ही सामने दक्षिण आफ्रिका संघ जिंकला आहे. भारताला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मायदेशात अद्याप एकही टी-२० मालिका जिंकता आलेली नाहीये. अशात ९ जूनपासून सुरू होणाऱ्या मालिकेत भारतीय संघाकडे इतिहास घडवण्याची संधी आहे.
यापूर्वी २०१५ आणि २०१९ साली भारत आणि दक्षिण आफ्रिकी (IND vs SA T20 Series) संघात मायदेशातील टी-२० मालिका खेळल्या गेल्या. या दोन्ही मालिकांमध्ये भारताला विजय मिळवता आला नाही. २०१५ साली २-० अशा अंतराने दक्षिण आफ्रिका संघ जिंकला होता. या मालिकेतील शेवटचा सामना रद्द केला गेला होता. त्यानंतर २०१९ मध्ये खेळली गेलेलील मालिका १-१ ने अनिर्णित झाली होती. या मालिकेतला देखील शेवटचा सामना काही कारणास्त रद्द केला गेला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मिशेल आणि ब्लंडेल जोडीची विक्रमतोड भागीदारी, १८ वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती
एका मिसळ पावच्या किंमती एवढं महाग श्रीलंका-ऑस्ट्रेलिया मॅचचं तिकीटं
पाकिस्तानला हरवत बक्षीस म्हणून मिळालेली ‘ऑडी १००’ पाहून शास्त्री भावूक, ३७ वर्षांनंतर पाहिली कार