---Advertisement---

कॅप्टन कोहलीचा मोठा किर्तीमान, दिग्गजांना पछाडत वनडेतील ‘या’ विक्रमांत टॉप-५ मध्ये उडी

---Advertisement---

गहुंजे स्टेडियम, पुणे येथे शुक्रवारी (२६ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा वनडे सामना झाला. पहिल्या सामन्यातील विजयी लय कायम राखण्याच्या दृष्टीने यजमान संघ आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करताना दिसला. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने ताबडतोब अर्धशतक झळकावत मोठा किर्तीमान आपल्या नावे केला.

प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताला पहिल्या १० षटकात २ मोठे धक्के बसले. सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा वैयक्तिक ३० धावाही न करता बाद झाले. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत विराटने छोटेखानी पण महत्त्वाची खेळी करत संघाचा डगमगता डाव सावरला. ७९ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने ६६ धावा केल्या.

यासह वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत त्याने टॉप-५ मध्ये उडी घेतली आहे. ९४ वनडे सामन्यात ५४२३ धावा करत तो पाचव्या स्थानावर विराजमान झाला आहे. याबाबतीत त्याने दक्षिण आफ्रिकाचे माजी कर्णधार ग्रीम स्मिथ यांना पिछाडीवर सोडले आहे. ते ५४१६ धावांसह सहाव्या स्थानावर आले आहेत.

https://twitter.com/SharadBodage/status/1375384806133952514?s=20

विराटव्यतिरिक्त वनडेत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी, न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग आणि श्रीलंकन दिग्गज अर्जुन रणतुंगा टॉप-५ मध्ये आहेत. पाँटिंग सर्वाधिक ८४९७ धावांसर अव्वस्थानी आहेत. तर धोनी (६६४१ धावा) दुसऱ्या, फ्लेमिंग (६२९५ धावा) तिसऱ्या आणि रणतुंगा (५६०८ धावा) चौथ्या स्थानावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारत-इंग्लंड टी२० सामना पाहायला गेलेले विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात, संपर्कातील व्यक्तींची चाचणी सुरू

ना सचिन, ना धोनी; पुण्यनगरीत असा विक्रम करणारा विराट कोहली ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू

अविश्वसनीय!! ट्रेंट बोल्टने डाइव्ह मारत टिपला भन्नाट झेल; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---