इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात सलामीला फलंदाजी करत टीम इंडियाला जिंकवणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजी क्रमांकाबद्दल मोठा खुलासा केला आहे. पाचव्या सामन्याआधी कोहलीने टी-२० मध्ये 83 डावात फक्त 7 वेळा डावाची सुरुवात केली होती, पण बऱ्याच दिवसानंतर रोहित शर्माबरोबर सलामीला येताच त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली.
विराटने 52 चेंडूत नाबाद 80 धावा करत इंग्लंडला 225 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले. त्याला उत्तर म्हणून अतिथी संघाने 20 षटकात केवळ 188 धावा केल्या आणि भारताने पाचवा सामना 36 धावांनी जिंकत 3-2 च्या फरकाने मालिका जिंकली. यानंतर टी-20 वर्ल्ड कपची तयारी पाहता कोहलीने आयपीएल 2021 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामीला येणार असल्याचे सांगितले आहे.
सामना जिंकल्यानंतर कोहली म्हणाला की, “मी अगोदर वेगळ्या स्थानावर फलंदाजी केली. पण आता मला समजले आहे की, आमच्याकडे मजबूत फलंदाजी फळी उपलब्ध आहे. म्हणूनच मी रोहितबरोबर सलामीला फलंदाजी करत वर्ल्ड कपपर्यंत ही लय सुरू ठेवू इच्छित आहे. त्यामुळे वर्ल्ड कपपुर्वी येणाऱ्या आयपीएल २०२० मध्येही आपल्या संघाकडून सलामी फलंदाजी करणार आहे.”
शेवटच्या सामन्यातील संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, “रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसला आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने चांगली फलंदाजी केली.आमच्यासाठी हा महत्वपूर्ण असा सामना होता. आम्ही समोरच्या टीमला बॅकफूटवर ढकलले आणि मागील सामन्याप्रमाणेच या सामन्यात देखील आम्ही फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरलो.”
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिकचे लागोपाठ २ गगनचुंबी षटकार, पत्नी नताशाने ‘अशी’ दिली रिऍक्शन; पाहा व्हिडिओ
Video: निर्णायक सामना जिंकताच विराटचे सर्वप्रथम रोहितला आलिंगन, शुभेच्छा देत थोपटली पाठ
अन् अचानक वातावरण तापलं! वाद घालण्यासाठी कोहलीची बटलरच्या दिशेने धाव, पाहा पूर्ण प्रकरण