आजची म्हणजेच 5 नोव्हेंबर ही तारीख भारतासोबतच जगभरातील सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, या दिवशीच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने या धरतीवर पहिले पाऊल ठेवले होते. म्हणजेच विराटचा यादिवशी वाढदिवस असतो. या खास दिवशी विराट मेलबर्नमध्ये आहे. याच मैदानावर रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) भारतीय संघाला टी20 विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध सामना खेळायचा आहे. विराटच्या वाढदिवसाचा जल्लोष भारतीय खेळाडूंनी केक कापून शानदार पद्धतीने साजरा केला. यामध्ये भारतीय खेळाडूंनी आणखी एका व्यक्तीचा वाढदिवस साजरा केला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
विराट कोहली त्याचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवशी सोशल मीडियावर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशात बीसीसीआयनेही एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये दिसते की, विराटने केक कापला आणि भारतीय खेळाडूंनी त्याचा वाढदिवस साजरा केला.
विराट कोहली आणि पॅडी अप्टन दोघांचा वाढदिवस केला साजरा
व्हिडिओत दिसते की, विराटने केक कापून सर्वप्रथम आपल्या संघाचे स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन यांना भरवला. पॅडी अप्टन हेदेखील 5 नोव्हेंबर रोजी 54वा वाढदिवस साजरा करतात. त्यामुळे विराट आणि पॅडी अप्टन दोघांनी एकत्र केक कापला आणि एकमेकांना भरवला. याक्षणी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह भारतीय संघाचे सर्व खेळाडूही उपस्थित होते. रिषभ पंत याने थोडा केक विराटच्या चेहऱ्यावरही लावला होता.
Birthday celebrations ON in Australia ???? ????
Happy birthday @imVkohli & @PaddyUpton1 ???? ???? #TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/sPB2vHVHw4
— BCCI (@BCCI) November 5, 2022
खरं तर, विराट कोहली या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. तसेच, तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा चोपणारा फलंदाजही बनला आहे. त्याने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यात त्याने 220च्या सरासरीने 220 धावा चोपल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, त्याने टी20 विश्वचषकात खेळलेल्या 25 सामन्यांमध्ये एकूण 1065 धावा चोपल्या आहेत. त्यामुळे तो टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर पाँटिंगचा सवाल; म्हणाला, ‘पंतला…’
‘अजिबात कारण देऊन चालणार नाही’, फेक फिल्डिंगवर बांगलादेशचा सल्लागार संतापला






