भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारताने विजयासाठी मिळालेले 100 धावांचे आव्हान केवळ तीन गडी गमावत पार केले. यासह भारतीय संघाने मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. या विजयानंतर कर्णधार शिखर धवन याने आपल्या संघासह जोरदार डान्स केला.
https://www.instagram.com/reel/Cjk7hrCqNj-/?igshid=YmMyMTA2M2Y=
मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने रांची व दिल्ली येथील सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करत विजय मिळवले. यासह सलग पाचवी वनडे मालिका जिंकण्याची कामगिरी भारतीय संघाने केली. प्रमुख संघ ऑस्ट्रेलियात असताना भारताचे युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी या मालिकेत केली. शिखर धवन अत्यंत प्रभावीपणे संघाचे नेतृत्व केले. या विजयानंतर या युवा खेळाडूंना एकजूट करत शिखर धवनने तुफान जल्लोष केला. प्रसिद्ध पंजाबी गायक दिलेर मेहंदी यांच्या ‘बोलो तारारारा’ या गाण्यावर संपूर्ण संघाने जोरदार डान्स केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने यापूर्वी झिम्बाब्वे दौऱ्यावर मालिका विजय साजरा केल्यानंतर काला चश्मा गाण्यावर अशाच प्रकारे डान्स केला होता. तो व्हिडिओ आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. शिखर धवनने हा व्हिडिओ शेअर केला होता.
अखेरच्या सामन्याचा विचार केला गेल्यास भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कुलदीप यादवच्या 4 व सुंदर, सिराज आणि अहमद यांच्या प्रत्येकी दोन बळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 99 धावांवर सर्वबाद केले. प्रत्युत्तरात, शुबमन गिलचे 49 व श्रेयस अय्यरच्या 28 धावांच्या जोरावर भारतीय संघाने 7 गडी राखून विजय संपादन केला. सामनावीर म्हणून कुलदीप यादव तर मालिकावीर म्हणून मोहम्मद सिराजची निवड केली गेली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराज-सुंदरनंतर कुलदीप शो! यादवसाठी दुसऱ्या क्रमांकाचा ‘वनडे स्पेशल’ संघ दक्षिण आफ्रिका, पहिल्या…
कार्तिकनंतर ‘हा’ असणार टीम इंडियाचा फिनिशर? संघ व्यवस्थापनाने आताच दिली जबाबदारी
कॅप्टन रोहितचा संघ टी20 वर्ल्डकपनंतर ‘या’ संघाच्या दौऱ्यावर जाणार, पाहा संपूर्ण स्केड्युल