दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत (sa vs ind test series) भारतीय संघाने १-२ असा पराभव स्वीकारला. या पराभवानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (world test championship) गुणतालिकेत भारतीय संघ खाली घसरून पाचव्या क्रमांकावर आला आहे. भारतीय संघाकडे गुणतालिकेत सध्या ५३ गुण आहेत. मात्र, गुणतालिकेतील स्थान टक्केवारीवरून ठरत आहे, भारताकडे सध्या ४९.०७ % आहेत. भारतीय संघ (team india) या मालिकेत पराभवानंतर जरी खाली घसरला असला, तरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यत पोहोचेल, अशी अपेक्षा कायम आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक संघाला सहा मालिका खेळायच्या आहेत. त्यापैकी तीन मालिका मायदेशात आणि तीन विदेशात खेळल्या जातील. भारताने विदेशातील तीन पैकी दोन मालिका खेळल्या आहेत. विदेशात खेळलेल्या मालिकेतील सात सामन्यापैकी तीन सामने संघाने जिंकले आहेत आणि तीन सामन्यात संघाला पराभव मिळाला आहे, तर एक सामना अनिर्णीत राहिला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील एक सामना रद्द केला गेला होता, जो यावर्षी खेळला जाणार आहे.
यानंतर अजिंक्यपद स्पर्धेतील उर्वरित कसोटी सामने भारताला अनुकूल परिस्थितीत खेळायचे आहेत. मार्च महिन्यात श्रीलंकेविरुद्ध मायदेशात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. तसेच, दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारताला बांगलादेश दौरा करायचा आहे.
भारताने नजीकच्या काळात मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यापैकी ९ मध्ये विजय मिळवला आहे. त्यापैकी एक सामना अनिर्णित, तर एकामध्ये संघाला पराभव मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेत भारताला आतापर्यंत एकही पराभव मिळालेला नाही. तसेच बांगलादेशचा विचार केला तर, बांगलादेश संघाने मायदेशात असो वा विदेशात, आतापर्यंत एकदाही भारताला कसोटी सामन्यात पराभूत केलेले नाही. आतापर्यंतचा इतिहास पाहता असे दिसते की, भारतीय संघासाठी या आगामी तिन्ही मालिका फायदेशीर ठरतील. संघ या ८ सामन्यापैकी किती सामने जिंकतो, ही गोष्ट पाहण्यासारखी असेल.
जे संघ भारताच्या वरती आहेत, ते खाली घसरणे निश्चित आहे –
जागतिक कसोटी अजिंक्यपदा स्पर्धेच्या गुणतालिकेत श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका हे संघ पहिल्या चार स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाला आगामी काळात पाकिस्तान आणि श्रीलंकेचा दौरा करायचा आहे. ऑस्ट्रेलियाने जर या दोन्ही दौऱ्यातील कसोटी मालिक जिंकल्या, तर पाकिस्तान आणि श्रीलंका गुणतालिकेत खाली घसरेल. जर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवले, तर ऑस्ट्रेलिया खाली येईल. श्रीलंकेला यानंतर न्यूझीलंड आणि बांगलादेश दौरा करायचा आहे. बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत श्रीलंका विजय मिळवू शकतो, परंतु न्यूझीलंडमध्ये विजय मिळवणे सोपी गोष्ट नसेल.
दक्षिण अफ्रिकेचा पुढचा प्रवास खडतर –
दक्षिण अफ्रिका संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे, पण त्यांचा पुढचा रस्ता खडतर दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेला आगामी काळात न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौरे करायचे आहेत. परंतु, त्याआधी त्यांना मायदेशात दोन सोप्या कसोटी मालिका खेळायच्या आहेत, ज्यामध्ये त्यांच्यासमोर बांगलादेश आणि वेस्ट इंडीजचे आव्हान असेल.
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेत विराटच्या नेतृत्वाला लागलेय ग्रहण! पराभवानंतर गंडले सारेच आकडे; तुम्हीही पाहा
VIDEO: मालिका गमावल्यावर विराटकडून आली सर्व प्रश्नांची उत्तरे; पाहा काय म्हणाला कर्णधार
सोळा वर्षात काहीही बदलले नाही! तेव्हा आणि आताही द्रविड अपयशी; वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –