भारताविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने सात विकेट्सने विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने २-१ अशा फरकाने कसोटी मालिका (sa vs ind test series) जिंकली. केपटाऊनमधील तिसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर विवाद पाहायला मिळाले. डीआरएस आणि अफ्रिकन ब्रॉडकास्टर्सच्या मुद्द्यावर भारताचा कर्णधार विराट कोहली याचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले होते.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत विराटला डीआरएसविषयी झालेल्या वादावर प्रश्न विचारला गेला. तेव्हा विराट म्हणाला की, “मला यावर काहीच बोलायचे नाहीय. जे काही झाले, ते मैदानावरच संपले.” विराटने सामन्यातील पराभवासाठी फलंदाजांना कारणीभूत ठरवले. तो म्हणाला की, “विदेशी परिस्थितीत आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान हेच आहे की, आम्ही लय कायम ठेऊ शकत नाही. जेथे आम्ही असे करू शकतो, तेथे आम्ही विजय मिळवला आहे. याठिकाणी आम्ही हेच करण्याचा प्रयत्न केला. पण सामन्यात ४०-४५ मिनिटांचा वेळ असा राहिला, जेव्हा आम्ही खराब फलंदाजी केली. विरोधी संघाने अप्रतिम गोलंदाजी केली.”
फलंदाजांमुळे मालिका गमावली
“यात कसलीच शंका नाही की, या मालिकेत आमच्या पराभवाचे कारण आमची खराब फलंदाजी राहिली आहे. मागच्या दोन सामन्यांमध्ये आमच्या फलंदाजीने आम्हाला खूप निराश केले. नक्कीच याच्यावर आता लक्ष द्यावे लागेल. आम्ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शन केले. मात्र, अफ्रिकेत चांगले प्रदर्शन करण्याची शाश्वती नसते. हेच खरे आहे की, आम्ही अफ्रिकेत जिंकलो नाही आणि आम्हाला याला सामोरे जायचे आहे.” असे विराट पुढे बोलताना म्हणाला.
Virat Kohli's press conference after the 3rd test match against South Africa 👏#SAvsIND #SAvIND #INDvsSAF #INDvSApic.twitter.com/o6GfGeRZ8n
— CRICKET VIDEOS 🏏 (@AbdullahNeaz) January 14, 2022
पुजारा रहाणेच्या खराब प्रदर्शनावर दिले उत्तर
भारताचे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी या मालिकेत निराशाजनक प्रदर्शन केले. या दोघांनी डावाची सुरुवात तर चांगली केली, पण त्यांना पुढे मोठ्या खेळीत बदलू शकले नाहीत. या खराब प्रदर्शनानंतर त्यांना संघातून बाहेर करण्याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. विराट याविषयी बोलताना म्हणाला की, दोघांनी चांगली भागीदारी केली. पुढचा निर्णय निवडकर्त्यांच्या हातात आहे.
केएल राहुल आणि रिषभ पंतचे केले कौतुक
केएल राहुलने मालिकेतील सेंचुरियनमधील पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. तसेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने केपटाऊनमध्ये शतकी खेळी केली. या दोघांचे कौतुक करताना विराट म्हणाला की, या मालिकेत सलामीवीराच्या रूपात केएल राहुलची फलंदाजी खास होती. केपटाऊनमध्ये पंतचे शतक आणि विशेषतः सेंचुरियनमध्ये मिळालेला विजय आमच्यासाठी खास राहिला.
महत्वाच्या बातम्या –
तब्बल तीस वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेचा किल्ला अभेद्य! सात भारतीय कर्णधार परतलेत रिकाम्या हाताने
“आता तरी रहाणे-पुजाराच्या जागा मोकळ्या होतील”
व्हिडिओ पाहा –