दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind test series) यांच्यातील तिसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. सामन्यात दक्षिण अफ्रिका संघाने विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. भारतीय संघ सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये अपेक्षित धावसंखेपर्यंत पोहोचू शकला नाही. विरोधी संघाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर उघडपणे वर्चस्व केल्याचे पाहायला मिळाले. भारताचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी पुन्हा एकदा निराशाजन प्रदर्शन केले. त्यांच्या प्रदर्शनानंतर माजी दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavasakar) यांनी आगामी मालिकेत त्यांच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन फलंदाजांनी मागच्या मोठ्या काळापासून एकही शतक केलेले नाही, सोबतच यादरम्यान ते अपेक्षित प्रदर्शन देखील करू शकले नाहीत. याच पार्श्वभूमीवर मागच्या बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातील त्यांच्या स्थानाविषयी अनेकदा प्रश्न उपस्थित झाले. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ते पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. रहाणेने या सामन्याच्या पहिल्या डावात ९ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात फक्त १ धाव करून तो बाद झाला. दुसरीकडे, पुजाराने सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे ४३ आणि ९ धावा केल्या. त्याच्या या खराब प्रदर्शनाचे संघाला देखील मोठे नुकसाना भोगावे लागले.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर फेब्रुवारी माहिन्यात भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशातील मालिका खेळायची आहे. गावसकरांच्या मते, या आगामी मालिकेत रहाणे आणि पुजाराच्या रूपात भारतीय संघात दोन जागा मोकळ्या होतील. प्रसारण वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना गावसकर म्हणाले, फक्त रहाणेच नाही तर, चेतेश्वर पुजाराला देखील बाहेर बसवण्याचा विचार केला जाऊ शकतो.
भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने अलिकडच्या काही दिवसांपूर्वी कसोटी पदार्पण केले आणि या सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी करून दाखवली होती. गावसकरांच्या मते या दोन खेळाडूंऐवजी अय्यरला संघात स्थान मिळू शकते. तसेच हनुमा विहारी भविष्यात चेतेश्वर पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो, असेही गावसकरांना वाटते.
दरम्यान, पुजारा आणि रहाणे यांच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर रहाणेने २०२० मध्ये त्याचे शेवटचे शतक केले होते. पुजाराचे शेवटचे शतक २०१९ मध्ये पाहायला मिळालेले. या दोघांना संघातून बाहेर करण्याविषयी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वीही चर्चा झाल्या होत्या. मात्र, संघ व्यवस्थापनाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. परंतु, या दोघांनी मात्र या दौऱ्यातही अपेक्षित प्रदर्शन केलेले नाही. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांतील सहा डावांपैकी या दोघांना प्रत्येकी एकदा अर्धशतकी खेळी केली.
महत्वाच्या बातम्या –
केकेआरला मिळाला नवा ‘गोलंदाजी गुरु’; भारतीय क्रिकेटसाठी दिलेय अतुल्य योगदान
व्हिडिओ पाहा –






