---Advertisement---

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने फडकवला तिरंगा, पत्नी मुलींसह अनोख्या पद्धतीने केला स्वातंत्र्य दिन साजरा

On: गुरूवार, ऑगस्ट 15, 2024 8:30 AM
---Advertisement---

संपूर्ण भारत देश आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यामध्ये मोठ्या व्यक्तींसोबत देशातील सर्वसामान्य नागरिकही सहभागी होत आहेत. मग भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मागे का राहील? भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त टीम इंडियाचा नवनिर्वाचित हेड कोच गौतम गंभीरनी हा खास दिवस आपल्या कुटुंबासह मोठ्या थाटामाटात साजरा केला.

वास्तविक, गौतम गंभीरने आपली देशभक्ती अनोख्या पद्धतीने दाखवली, ज्याची झलक त्याच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये गंभीर त्याची पत्नी नताशा जैन आणि दोन्ही मुली तसेच घरातील कर्मचाऱ्यांसह तिरंग्यासमोर अभिमानाने उभा असल्याचे दिसत आहे.

चित्रात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणि अभिमानाची भावना स्पष्टपणे दिसत आहे. या चित्रांमुळे देशप्रेमाची भावना आणखी दृढ झाली आहे, जी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व दर्शवते. या खास प्रसंगी गौतम गंभीरचे कुटुंबही त्याच्यासोबत उभे होते आणि त्याच्या या फोटोचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

एकदिवसीय विश्वचषक 2011 विजेत्या भारतीय संघाचा सदस्य असलेल्या गौतम गंभीरने 9 जुलै 2024 पासून भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आपली नवीन भूमिकेला सुरूवात केली आहे. गंभीरने या पदासाठी तीन वर्षांचा करार केला आहे आणि आता तो भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेणार यात तीळमात्र शंका नाही. असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

हेही वाचा-

टीम इंडियाचा सर्वात मोठा फिनिशर, 54 ची सरासरी, तरी ही दुलीप ट्राॅफीतून वगळले! या खेळाडूची प्रतिभा धूळखात?
“माझ्यासाठी तुम्ही सर्व सुवर्णपदक विजेते…” राष्ट्रपतींनी केलं ऑलिम्पिक पदक विजेत्यांचं अभिनंदन!
हार्दिक पांड्या पुन्हा डेट करतोय? कोण आहे सोशल मीडिया स्टार जास्मिन वालिया?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---