भारतीय क्रिकेट संघाचा डॅशिंग फलंदाज रिंकू सिंग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत रिंकू सिंगच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये हा स्टार खेळाडू स.पा खासदार प्रिया सरोजसोबत दिसत आहे. जेव्हा प्रिया सरोजच्या वडिलांशी लग्नाच्या छायाचित्रांबद्दल संपर्क साधला गेला तेव्हा त्यांनी सांगितले की हे छायाचित्र खोटे आहे. परंतु प्रिया सरोज आणि रिंकू सिंगच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत.
प्रिया सरोज यांचे वडील आणि तीन वेळा खासदार राहिलेल्या तूफानी सरोज यांनी सांगितले की, त्यांची मुलगी आणि रिंकू यांची भेट एका मित्रामार्फत झाली. ज्याचे वडील देखील क्रिकेटपटू आहेत. ते म्हणाले की रिंकू आणि प्रिया एकमेकांना एका वर्षापेक्षा जास्त काळ ओळखत आहेत. आता दोघेही एकमेकांना आवडतात. दोन्ही मुलांनी आपापसात एक अट घातली होती की ते त्यांच्या कुटुंबाच्या संमतीनेच लग्न करतील. आता दोन्ही कुटुंबे या लग्नासाठी तयार आहेत.
Priya Saroj’s father said – “Rinku Singh and Priya have known each other for more than a year now. They both liked each other but Needed the consent of their families for their relationship. And Both the families have agreed to this marriage”. (PTI). pic.twitter.com/o4PyDgLB6g
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 22, 2025
संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरवली जाईल. असे त्यांनी सांगितले. हा साखरपुडा लखनऊमध्ये होईल. रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांनी त्यांचे नाते गुप्त ठेवले होते. या साखरपुड्याच्या फोटोपूर्वी प्रिया सरोज आणि रिंकू सिंग एकत्र दिसले नव्हते. डेटिंगच्या बातम्यांऐवजी, रिंकू सिंगने थेट चाहत्यांना लग्नाची बातमी दिली.
प्रिया सरोज यांनी गेल्या वर्षी जौनपूर जिल्ह्यातील मछलीशहर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. प्रिया सरोजच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, तिने दिल्ली विद्यापीठातून कला शाखेची पदवी आणि नोएडातील अमिटी विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. जेव्हा त्यांच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर आली तेव्हा तिच्या वडिलांनी सुरुवातीला या नात्याला नकार दिला. परंतु नंतर त्यांनी मान्य केले की चर्चा सुरू आहे. प्रिया सरोजच्या वडिलांनी सांगितले की त्यांना त्यांच्या मुलीचे लग्न एका आयएएस अधिकाऱ्याशी करायचे होते पण प्रियाला एका क्रिकेटपटूची आवड असल्याने त्यांना त्यात कोणतीही अडचण नाही. दोन्ही कुटुंबे लग्नासाठी तयार आहेत.
हेही वाचा-
सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, टीम इंडिया इतक्या वर्षापासून टी20 मालिकेत अपराजित
IND VS ENG; पहिल्या टी20 मध्ये रिंकू सिंगला संधी मिळणार? या 4 खेळाडूंच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह
“युझवेंद्र चहलची फाईल केव्हाच बंद..”, माजी क्रिकेटपटूचा बीसीसीआय-संघ व्यवस्थापनावर आरोप