भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि कोच राहुल द्रविडच्या गाडीची धडक बेंगलोरमध्ये एका रिक्षाला बसली. याचा सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. मंगळारी (4 फेब्रुवारी) संध्याकाळी ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
रस्त्याने जात असलेल्या एकाने हा व्हिडीओ शुट केला आहे. यामध्ये द्रविडची गाडी सामान वाहून नेणाऱ्या एका रिक्षाला धडकल्याचे दिसतेय. यामुळे द्रविडची व त्या रीक्षा ड्रायव्हरची भांडणे होत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. यावेळी द्रविड त्याची मातृभाषा कन्नडमध्ये ड्रायव्हरशी बोलताना दिसतोय. अजूनपर्यंत हे स्पष्ट झाले नाही की गाडी द्रविड चालवत होता की अन्य कुणी.
माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, ही घटना बेंगलोरमध्ये अतिशय गजबज असलेल्या कनिंघम रोड परिसरात झाली. घटना घडली तेव्हा द्रविड इंडियन एक्सप्रेस जंक्शनजवळील ग्राऊंडकडे चालला होता. यावेळी द्रविडची गाडी ट्राफिकमध्ये फसली होती, त्यावेळी रिक्षा ड्रायव्हरने त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. घटनास्थळावरून जात असताना द्रविडने ड्रायव्हरचा नंबर घेतल्याचे बोलले जात आहे. घटनेबद्दल आणखी माहिती समोर आलेली नाही परंतू भडकलेल्या द्रविडचा व्हिडीओ मात्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
Indian cricketer Rahul Dravid’s car & a commercial goods vehicle were involved in a minor accident on Cunningham road in #Bengaluru. And unlike the #cred ad, #RahulDravid & the goods vehicle driver engaged in a civilized argument & left the place later. No complaint so far pic.twitter.com/HJHQx5er3P
— Harish Upadhya (@harishupadhya) February 4, 2025
या घटनेची कोणतीही केस किंवा तक्रार दाखल झालेली नाही. राहुल द्रविड भारतीय संघाचा माजी कर्णधार व प्रशिक्षक राहिला आहे. भारताकडून खेळताना द्रविडने 164 कसोटी, 344 वनडे आणि 1 टी20 सामना खेळला आहे. भारताचा हा दिग्गज क्रिकेटर टीम इंडियाचा प्रशिक्षक असताना संघाने 2024चा टी20 विश्वचषक जिंकला आहे. सप्टेंबर महिन्यात त्याची राजस्थान रॉयल्स संघाचा आयपीएल 2025 साठी प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
हेही वाचा-
Champions Trophy; ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का.! संघाचा कर्णधार स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता
वर्ल्ड रेकाॅर्ड..! वयाच्या 26 व्या वर्षी रशीद खानने घेतले सर्वाधिक टी20 विकेट्स, ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडित
डेव्हिड मिलरने रचला इतिहास, एबी डिव्हिलियर्स-फाफ डु प्लेसिस जवळपासही नाही