भारतीय क्रिकेट संघाला एका शिस्तबद्ध खेळाडू उणीव भासत आहे. मात्र या खेळाडूला भारताच्या कोणत्याही फाॅरमॅटमध्ये परत स्थान मिळणे अशक्य वाटत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या खेळाडूला पहिल्यांदा कसोटी संघातून वगळण्यात आले, नंतर टी-20 संघातून आणि त्यानंतर या क्रिकेटपटूला एकदिवसीय संघातूनही वगळण्यात आले. अशा परिस्थितीत भारतीय संघाच्या या गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता संपुष्टात येताना दिसत आहे.
टीम इंडियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची कारकीर्द आता संपलेली दिसत आहे. आता या क्रिकेटपटूसमोर निवृत्ती हा एकमेव पर्याय उरला आहे. भुवनेश्वर कुमारने 21 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. याशिवाय भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात उत्कृष्ट कामगिरीसाठी भुवनेश्वर कुमार हा ‘सामनावीर’ ठरला होता, परंतु यानंतर त्याची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली.
या सामन्यानंतर भुवनेश्वर कुमारला भारतीय कसोटी संघात संधी मिळाली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार ही टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद होती. भुवनेश्वर कुमार चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करून विकेट मिळवायचा आणि गरज पडेल तेव्हा त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी करून भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. 2018 मध्ये त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात भुवनेश्वर कुमारने जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 63 धावा केल्या आणि 4 मोठ्या विकेट्सही घेतल्या होत्या.
वास्तविक बोलायचे झाले तर, भुवनेश्वर कुमारने आता त्याच स्पीड गमावला आहे, सुरुवातीला त्याच्याकडे अचूकता होती, जिथे तो चेंडू स्विंग करून विकेट घेत होता. पण आता भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीत लक्षणीय घट झाली आहे. भुवनेश्वर कुमारचा वेगही कमी झाला आहे.
हेही वाचा-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 6 नव्हे तर 12 पदके मिळाली असती; जाणून घ्या कशी झाली चूक
Paris Olympics: समारोप समारंभ कधी, कोठे किती वाजता; पाहा सगळं काही एका क्लिकवर
Paris Olympics: यंदाच्या ऑलिम्पिक मोहीमेत भारताची इतक्या पदकांची कमाई; सर्वोत्तम कामगिरीत दुसऱ्या स्थानी