---Advertisement---

शार्दुल + तेंडूलकर= शार्दुलकर..! सचिनशी तुलना करत भारतीय दिग्गजाने ठाकूरला दिलं नवं टोपणनाव 

On: रविवार, जानेवारी 24, 2021 10:32 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताचा गोलंदाज शार्दुल ठाकूर याने अतुलनीय कामगिरी केली होती. या सामन्यात गोलंदाजीसह फलंदाजीतही दमदार प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. दरम्यान फलंदाजी करताना त्याने काही आकर्षक शॉट खेळले होते, ज्यामध्ये कव्हर ड्राइव्हचा समावेश होता. यानंतर भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी शार्दुलच्या कव्हर ड्राइव्हची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरशी तुलना केली आहे. सोबतच त्याला नवे टोपणनावही दिले आहे.

शार्दुलच्या खेळीने केला होता सामन्याचा कायापालट

ब्रिस्बेन कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघाला ३७० धावांचे मोठे आव्हान मिळाले होते. संघातील आघाडीचे सहा फलंदाज माघारी गेल्यानंतर हा २९ वर्षीय खेळाडू खालच्या फळीत आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यानंतर शार्दुलने आक्रमक पवित्रा अंगीकारत ११५ चेंडूत ६७ धावांची महत्त्वपुर्ण खेळी केली. यादरम्यान त्याने २ षटकार आणि ९ चौकार मारले होते.

सोबतच त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत मिळून शतकी भागिदारी साकारली. यामुळे भारतीय संघाचा पहिला डाव ३३६ धावा संपला होता आणि ऑस्ट्रेलियाला नाममात्र ३४ धावांची आघाडी मिळाली होती.

श्रीधर यांनी ठाकूरला दिले ‘शार्दुलकर’ टोपणनाव

शार्दुलची धावसंख्या ही भारताच्या पहिल्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. यावेळी त्याने शानदार कव्हर ड्राइव्हवर चौकारही लगावले होते. त्याच्या त्या अप्रतिम शॉटला पाहिल्यानंतर श्रीधर यांना भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन याच्या कव्हर ड्राइव्ह शॉटची आठवण झाली. त्यामुळे श्रीधर यांनी शार्दुलच्या कव्हर ड्राइव्हची सचिनशी तुलना केली आहे. “सचिन तेंडूलकरनंतर भारतीय संघाकडे शार्दुलकर आहे, जो अतिशय सुंदर कव्हर ड्राइव्ह खेळत आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.

गोलंदाजीतही शार्दुलने दिले होते महत्त्वपुर्ण योगदान

ऑक्टोबर २०१८ मध्ये शार्दुलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावेळी अवघे १० चेंडू टाकल्यानंतर दुखापती होत शार्दुल मैदानाबाहेर पडला होता. त्यानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला तब्बल २६ महिने वाट पाहावी लागली. अखेर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापती झाल्याने ब्रिस्बेन कसोटीत त्याला संधी मिळाली. यावेळी संधीचे सोने करत त्याने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ४ अशा एकूण ७ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

“मुलीच्या जन्मापेक्षा जास्त आनंद देशाकडून खेळण्यात होता”, टी नटराजनचं मन जिंकणार वक्तव्य

“नटराजनला स्टार्कची गोलंदाजी खेळतांना पाहून अजिंक्य रहाणेला भरली होती धडकी! ‘हा’ निर्णय घेण्याचाही केला होता विचार”

भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरला रिलीज करण्यास तामिळनाडू संघाचा नकार, ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---