---Advertisement---

IND vs NZ: “धोनीकडून शिकावे….”, माजी क्रिकेटपटूचा कर्णधार रोहित शर्माला सल्ला….

---Advertisement---

ind vs nz; बेंगळुरू येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारत संकटात सापडला असून, सामना हातातून निसटत असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 356 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताची शानदार सुरुवात झाली. दरम्यान आता माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट तज्ज्ञ संजय मांजरेकर यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया 46 धावा करून ऑलआऊट झाली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्या. टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. रोहितच्या कर्णधारपदात कशाची कमतरता आहे. हे त्यांनी सांगितले. मांजरेकर यांनी रोहितच्या कर्णधारपदाची तुलना महेंद्रसिंग धोनीशी केली आहे. ते म्हणाले की रोहितकडे धोनीसारखे काहीही नाही.

टीम इंडियाच्या कामगिरीचा विचार करून मांजरेकर यांनी ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले, “धोनीमध्ये एक अनोखा गुण आहे. जास्त नुकसान होण्याआधी तो गोलंदाजीत बदल करत असे. रोहितला त्याच्या नेतृत्वात ही गुणवत्ता आणण्याची गरज आहे.”

टीम इंडियाच्या पहिल्या डावात केवळ 2 धावा करून रोहित बाद झाला होता. मात्र, दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक झळकावले. रोहितने 63 चेंडू खेळत 52 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला. या बातमी आखेरीस भारत 118-2 अश्या स्थितीत आहे. सध्या खेळपट्टीवर सर्फराज खान आणि विराट कोहली नाबाद आहेत.

हेही वाचा-

WTC 2025 Points Table; पाकिस्तानची आगेकूच! इंग्लंडला धक्का? टीम इंडिया टाॅपवर..!
शाकिब अल हसनच्या जीवाला धोका? शेवटच्या सामन्यापूर्वी मोठा गोंधळ! संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
PAK vs ENG, जे भारताला नाही जमलं, ते पाकिस्तानने करुन दाखवलं; 52 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये असे घडले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---