भारतीय संघातील खेळाडूंसाठी 2023 हे वर्ष चांगले ठरताना दिसत आहे. अनेक खेळाडूंनी वर्षाच्या सुरुवातीलाच शतके झळकावत आपला ठसा उमटवला आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या नावाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या दोघांना पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात निवडले गेले आहे. सूर्यकुमार दीर्घ काळापासून टी20 आणि वनडे या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताच्या मधल्या फळीचा कणा बनला आहे. तसेच, सर्वात कठीण क्रिकेट प्रकार असलेल्या कसोटीत ईशान आणि सूर्यकुमार हे दोघेही भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहेत. अशात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे भाष्य केले आहे.
सूर्यकुमार यादवचे नागपूर कसोटी पदार्पण पक्के?
खरं तर, 2021मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारताला शिखरावर पोहोचवणारे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या पदार्पणाविषयी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “सूर्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संधी मिळू शकते. तो त्याचा नैसर्गिक आणि आक्रमक खेळ खेळताना दिसेल.” बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेच्या 48 तासांपूर्वी माजी मुख्य प्रशिक्षकांनी केलेल्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, संघ व्यवस्थापन आणि कर्णधार सूर्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये सामील करण्याची रणनीती बनवत आहेत.
पाचव्या क्रमांकावर करू शकतो फलंदाजी
मात्र, अंतिम अकरामध्ये सूर्यकुमारचे नाव असेल की नाही, याबाबत 9 फेब्रुवारी पहिल्या कसोटीतच समजेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-4 फिरकीपटूंसोबत मैदानावर उतरू शकतो. याव्यतिरिक्त 2 वेगवान गोलंदाज आणि 5 फलंदाजांना घेऊन संघ तयार होताना दिसत आहे. या अंतिम अकरामध्ये सूर्याला 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. कारण, श्रेयस अय्यर हा दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो संघातून बाहेर पडला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची संभावित प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी (team india former head coach ravi shastri siad suryakumar yadav might debut in ind vs aus 1st test know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला प्रीमिअर लीगच्या तारखा ठरल्या, ‘या’ दिवशी रंगणार पहिला सामना; 13 फेब्रुवारीला पार पडणार लिलाव
क्रिकेटला 2023मध्ये गुडबाय म्हणणारे 5 खेळाडू, यादीत 2 भारतीयांचाही समावेश