भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय पहिल्यांदाच इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर महिला प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करत आहे. या लीगबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशात या स्पर्धेला कधी सुरुवात होणार, तसेच ही स्पर्धा कुठे खेळवली जाणार असेही प्रश्न क्रिकेटप्रेमींमध्ये होते. अशात याचा खुलासा झाला आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी माध्यमांशी बोलताना याचा खुलासा केला आहे.
अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी (PTI) बोलताना सांगितले की, महिला प्रीमिअर लीग (Womens Premier League) स्पर्धा 4 ते 26 मार्च दरम्यान मुंबईमध्ये खेळवली जाईल. धुमाळ यांनी हेदेखील स्पष्ट केले की, या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात होणाऱ्या सामन्याच्या एक दिवसानंतर म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी मुंबईत होईल. या लीगमधील सर्व सामने ब्रेबॉर्न स्टेडिअम आणि डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये खेळले जातील. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई विरुद्ध गुजरात जायंट्स (Mumbai vs Gujarat Giants) संघात खेळला जाईल.
महिला प्रीमिअर लीग स्पर्धेसाठी बीसीसीआय जोरदार तयारी करत आहे. बोर्डाने 5 संघांच्या लिलावातून तब्बल 4669 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच, यानंतर मीडिया हक्कातून 951 कोटी रुपयेदेखील कमावले आहेत. यामुळे महिला प्रीमिअर लीग ही आयपीएलनंतर जगातील दुसरी सर्वात मोठी टी20 लीग बनली आहे. आयपीएलच्या 3 फ्रँचायझी या लीगमध्ये संघ खरेदी करण्यात यशस्वी झाल्या. त्यात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याव्यतिरिक्त ग्लोबल होल्डिंग्स (लखनऊ) आणि अदानी स्पोर्ट्सलाईनने महिला प्रीमिअर लीगसाठी फ्रँचायझी संघ खरेदी केले आहेत.
जवळपास 1500 खेळाडूंनी केली नावनोंदणी
महिला प्रीमिअर लीगसाठी जवळपास 1500 खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. खेळाडूंची अंतिम यादी पुढील काही दिवसांमध्ये जारी होण्याची अपेक्षा आहे. 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लिलावात प्रत्येक फ्रँचायझी खेळाडूंवर 12 कोटी रुपये खर्च करू शकेल. संघांना कमी कमी 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडूंवर बोली लावावी लागेल.
महिला प्रीमिअर लीगमध्ये एकूण 22 सामने खेळले जातील. गुणतालिकेत अव्वलस्थानी राहणारा संघ थेट अंतिम सामन्यात स्थान मिळवेल. तसेच, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघात अंतिम सामन्यात जागा मिळवण्यासाठी नॉकआऊट सामना खेळला जाईल. (womens premier league 2023 schedule released league to run for 23 days)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटला 2023मध्ये गुडबाय म्हणणारे 5 खेळाडू, यादीत 2 भारतीयांचाही समावेश
बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार ऍरॉन फिंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त