भारतीय संघाचे माजी निवड समिती प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी अनेक वर्षे क्रिकेट खेळल्यामुळे त्यांच्याकडे अनुभव होता. त्यामुळे जेव्हा ते भारतीय संघाचे निवड समिती प्रमुख बनले, तेव्हा त्यांनी भारतीय संघासाठी प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना भारताचे सर्वात चांगले निवड समिती प्रमुख म्हणूनही ओळखले जाते.
त्यांनी भारतीय संघातील एक, दोन नव्हे तर अनेक युवा खेळाडूंची प्रतिभा ओळखली होती. आज ते खेळाडू जागतिक दर्जाचे खेळाडू बनले आहेत.
त्यांनी सर्वप्रथम युवा खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) प्रतिभा ओळखली होती. या माजी कर्णधाराने निवड समितीचे अध्यक्ष म्हणून २००६ ते २००८ दरम्यानच्या कारकीर्दीत येणाऱ्या निवडकर्त्यांसाठी एक उदाहरण तयार करून ठेवले. कारण त्यांच्या कारकीर्दीत एमएस धोनी (MS Dhoni) कर्णधार झाला आणि त्यांनी विराटची बाजू घेतली.
याविषयी बोलताना त्यांनी खुलासा केला की, “खेळाडूंची प्रतिभा ओळखणे हे माझे काम होते. तुम्ही खेळाडूंची प्रतिभा ओळखण्यात चांगले असू शकता. परंतु जर कोणी प्रतिभावान असेल तर त्याला संधी मिळाली पाहिजे.”
“मी धोनीसारख्या क्रिकेटपटूंच्या कलागुणांचा शोध लावणाऱ्या टॅलेंट रिसर्च डेव्हलपमेंट विभागाशी (Talent Resource Development Wing) संबंधित होतो. त्यामुळे निवड समितीच्या अध्यक्षपदावरून न्याय देण्यात यशस्वी झालो,” असे वेंगसरकर याचे मत आहे. परंतु सध्या टीआरडीडब्ल्यू अस्तित्वात नाही.
वेंगसरकर पुढे म्हणाले की, “टीआरडब्ल्यूचा अध्यक्ष म्हणून मी ज्यूनिअर क्रिकेटमध्ये विराटला एकदा पाहिले होते. त्यामुळे जेव्हा मी निवड समितीचा अध्यक्ष झालो, तेव्हा आम्ही विराटला ऑस्ट्रेलियासारख्या उद्योन्मुख संघाच्या दौऱ्यासाठी निवडले. मी तिथे होतो. तसेच जेव्हा मी त्याला फलंदाजी करताना पाहिले, तेव्हा मला माहिती होते की तो क्रिकेटमध्ये एक मोठी जबाबदारी स्विकारण्यासाठी तयार आहे.”
“कोणत्याही खेळाडूची कारकीर्द किती टिकेल हे तुम्ही ठरवू शकत नाही,” असेही वेंगसरकर यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कोरोनामुळे क्रिकेटमध्ये येणार ३ नवेकोरे नियम? खेळाडूंना जाणार या गोष्टी करणे जड
-दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकणारे ३ भारतीय कर्णधार
-भारतात एकही कसोटी सामना न जिंकणारे ३ महान कर्णधार