---Advertisement---

फायनलच्या वाटेवर असलेल्या टीम इंडियाने घेतला भारतीय जेवणाचा आस्वाद; या स्पेशल रेस्टॉरंटची केली निवड

On: बुधवार, नोव्हेंबर 9, 2022 6:05 PM
Team-India
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ गुरुवारी (10 नोव्हेंबर) उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल.‌‌ ऍडलेड येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडशी दोन हात करायचे आहेत. तब्बल 15 वर्षानंतर भारतीय संघ विश्वचषक पटकावण्यासाठी आतुर आहे. अंतिम सामन्यात उतरण्यापूर्वी भारतीय संघाने खास भारतीय जेवणाचा आनंद लुटला.

ऍडलेड ओव्हल येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. खेळाडूंवर अतिरिक्त दबाव नसल्याचे कर्णधार व प्रशिक्षकांनी सांगितले होते. त्याचाच भाग म्हणून खेळाडूंना कुटुंबासोबत मोकळा वेळ घालवण्याची मुभा देण्यात आलेली. त्यामुळे भारतीय संघाने आपल्या कुटुंबासोबत भारतीय पद्धतीचे जेवण करण्याला प्राधान्य दिले.

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध ब्रिटिश राज या रेस्टॉरंटमध्ये भारतीय संघाने आपल्या कुटुंबीयांसमवेत हजेरी लावली.‌ टॉरेन्सविले येथील हेन्ली बीच या ठिकाणी हे प्रसिद्ध रेस्टॉरंट स्थित खास भारतीय पद्धतीचे जेवण या ठिकाणी मिळते. यामध्ये प्रामुख्याने चिकन टिक्का, कश्मीरी पुलाव व रोगन जोश यांचा समावेश आहे.

भारतीय संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलताना म्हटले,

“संपूर्ण संघ या विश्वचषकात शानदार खेळला आहे. मात्र, यादरम्यान त्यांना दबावापासून लक्ष हटवण्यासाठी तितकासा वेळ मिळाला नाही. खेळाडू पूर्णपणे ताजेतवाने व्हावे यासाठी खेळाडूंना ही मुभा देण्यात आलेली. त्यामुळे सर्वजण पुन्हा एकदा एकजूट झाले.”

भारतीय संघ जवळपास एक महिन्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये आहे. यादरम्यान संघाने सातत्याने प्रवास केला असून, ऑस्ट्रेलियासारख्या खंडप्राय देशात सातत्याने प्रवास करावा लागत असल्याने भारतीय खेळाडू थकल्याचे सांगितले जाते.‌ तसेच, विश्वचषक सुरू होण्याआधी झालेल्या सराव सामन्यांच्या आधी भारतीय संघाला देण्यात आलेल्या जेवणावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. या घटनेनंतर आयोजकांना भारतीय संघाची माफी देखील मागावी लागलेली.

(Team India Had Dinner In British Raj Restaurant Before Semi Finals)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपात श्रीलंकन खेळाडू अटकेत, आता बोर्ड म्हणतंय, ‘आम्ही उचलणार खर्च’
पाकिस्तानने न्यूझीलंडला रोखलं! अंतिम फेरी गाठण्यासाठी बाबर सेनेसमोर 153 धावांचे लक्ष 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---