---Advertisement---

आशिया चषकात ‘या’ तीन चुका भारताला पडल्या महागात; जर टाळल्या तर टी-20 विश्वचषक आपलाच!

On: गुरूवार, सप्टेंबर 8, 2022 1:55 PM
Team India
---Advertisement---

आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघाकडून चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले, अशी खात्री चाहत्यांना होती, परंतु तसे झाले मात्र नाही. सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका संघांविरुद्ध भारताने सलग दोन पराभव स्वीकारले आणि स्पर्धेतून बाहेर पडला. आपण या लेखात भारतीय संघाने केलेल्या काही चुकांवर नजर टाकणार आहोत. संघाने जर या चुका टाळल्या, तर आगामी टी-२० विश्वचषकात त्यांच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल. 

मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघाच्या खराब प्रदर्शनानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने कर्णधारपद सोडले. त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा कर्णधार बनला. तसेच रवी शास्त्रींचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. रोहित आणि राहुलची जोडी चांगली कांमगिरी करत असली, तरी आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ पूर्णपणे तयार दिसत नाही. संघात सतत होत असलेले बदल अडचणीची बाब ठरत आहे.

वरच्या फळीविषयी घ्यावे लागणार महत्वाचे निर्णय
आयसीसी टी-20 विश्वचषक अवघ्या 40 दिवसांवर आला आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषकात भारताकडून खूप अपेक्षा आहेत, परंतु संघ आशिया चषकात तसे प्रदर्शन करताना दिसला नाही. विश्वचषकापूर्वी भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांसोबत मायदेशात टी-२० मालिका खेळायच्या आहेत. या मालिकेतील शेवटचा सामना 11 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल आणि त्यानंतर संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. या दोन्ही टी-20 मालिकांमध्ये भारताकडे प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्याची संधी आहे. त्यातही वरची फळी अधिक विचारपूर्वक निवडावी लागेल.

मागच्या टी-20 विश्वचषकात भारताच्या खराब प्रदर्शनाचे कारण त्यांची वरची फळीच राहिली होती. आशिया चषकात देखील भारत त्याच वरच्या फळीसोबत खेळला आणि संघ पुन्हा एकदा चांगले प्रदर्शन करू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मासोबत केएल राहुल डावाची सुरुवात करण्यासाठी आला होता. परंतु त्याला या 4 सामन्यांमध्ये 104 च्या स्ट्राईक रेटने 70 धावा केल्या. राहुलचे हे आकडे टी-20 क्रिकेटच्या मानाने चांगले म्हणता येणार नाहीत. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळताना फॉर्ममध्ये परताना दिसत आहे. परंतु त्याचा स्ट्राईक रेट 122 आहे, जो टी-20 क्रिकेटच्या मानाने कमीच म्हणता येईल.

रोहित शर्मा ताबडतोड फलंदाजी करताना दिसत आहे. तो संघाचा चांगली सुरुवात देखील देत आहे, परंतु त्याचे हे प्रदर्शन मोठ्या खेळीत बदलताना दिसले नाही. अशात रोहितकडून देखील अधिक अपेक्षा असतील. मागच्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाने अनेक सलामीवीर आजमावून पाहिले आहेत. रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा यांनी डावाची सुरुवात केली होती. त्यापैकी सूर्यकुमारने प्रभाव पाडला होता. सूर्यकुमार मैदानात प्रत्येक दिशेला शॉट्स मारू शकतो. अशात सलामीसाठी रोहितसोबत त्याला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध आजमावले जाऊ शकते.

कार्तिक की पंत? घ्यावा लागणार निर्णय
टी-20 विश्वचषक तोंडावर आला आहे आणि भारताचा यष्टीरक्षक फलंदाज अजूनही निश्चित नाहीये. अद्याप हे ठरले नाहीये की, टी-20 विश्वचषकात रिषभ पंत यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडणार की, दिनेश कार्तिकवर ही जबाबदारी सोबवली जाईल. कार्तिक आयपीएल 2022 पासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये त्याने यष्टीरक्षक आणि संघासाठी उत्कृष्ट फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. दुसरीकडे संघ रिषभ पंतला पुढच्या मोठ्या काळासाठी संघ विचारात घेत आहे.

कार्तिक आशिया चषकातील ग्रुप स्टेजच्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळला. पाकिस्तानविरुद्ध त्याला एक चेंडू खेळण्याची संधी मिळाली, तर हाँगकाँगविरुद्ध त्याला फलंदाजी आलीच नाही. अशात संघ व्यवस्थानने सुपर फोर सामन्यांसाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यामुळे अनेक प्रश्नांंना तोंड फुटले आहे. रिषभ पंत सुपर फोरमध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्यो होता, परंतु त्याला काही खास प्रदर्शन करता आले नाही. कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक द्रविड यांच्यापुढे संघाचा यष्टीरक्षक निश्चित करण्याचा एक मोठा प्रश्न सध्या आहे.

संघ बांधणीवर द्यावे लागणार लक्ष
मागच्या टी-20 विश्वचषकानंतर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल पाहिले गेले. यादरम्यानच्या काळात खेळलेल्या 27 सामन्यांमध्ये एकूण 25 पेक्षा जास्त खेळाडूंना टी-20 फॉरमॅटमध्ये आजमावले गेले. यात गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक सर्वांचा समावेश आहे. बेंच स्ट्रेंथ पाहण्यासाठी हा प्रयोक चांगला असू शकतो. परंतु टी-२० विश्वचषक अगदी जवळ आला असताना आता असे प्रयोक करणेय योग्य ठरणार नाही. संघातील काही खेळाडू सोडले, तर इतरांना माहिती देखील नाहीये की, पुढच्या सामन्यात त्याला नक्की कोणत्या भूमिकेत मैदानात उतरायचे आहे.

दुसरीकडे श्रीलंका आणि पाकिस्तान संघांमध्ये देखील अनेक बदल यादरम्यानच्या काळात झाले. पण या बदलांचा परिणाम त्यांच्या संघावर चांगला झाल्याचे दिसले. या दोन्ही संघांना प्रत्येक 15 – 15 खेळाडूंना टी-20 संघासाठी आजमावले, संघ बांधनीत जास्त बदल केला नाही. याच कारणास्तव टी-20 विश्वचषकापूर्वी त्याचे संघ चांगले प्रदर्शन करताना दिसत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकात ‘या’ तीन चुका भारताला पडल्या महागात; जर टाळल्या तर टी-20 विश्वचषक आपलाच!
ASIA CUP: शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचे हे खेळाडू भारतासाठी काळ ठरणार!
PAKvsAFG: सामन्यातील पराभवानंतर अफगाणि चाहत्यांचे ‘तालिबानी रुप!’ मैदानातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---