---Advertisement---

टीम इंडिया कधीही जिंकली नाही रविवारी फायनल, पाहा नकोशी आकडेवारी!

On: शुक्रवार, मार्च 7, 2025 7:54 AM
---Advertisement---

(Champions trophy 2025 Final) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक 2:00 वाजता होईल. (India vs New Zealand Dubai Final) भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे, न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. दरम्यान फायनलपूर्वी भारतीय संघासाठी एक नकोशी आकडेवारी समोर येत आहे. जो की असा, भारताने नेहमीच रविवार वगळता सर्व दिवशी अंतिम सामना जिंकला आहे.

भारताच्या क्रिकेट इतिहासात, अंतिम सामने बहुतेक वेळा शनिवार किंवा सोमवार या दिवशी खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. 1983 चा विश्वचषक अंतिम सामना शनिवारी झाला होता, तर 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना सोमवारी झाला होता. त्याचप्रमाणे, 2007 च्या टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना सोमवारी झाला होता, आणि 2011 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना शनिवारी झाला होता. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना सोमवारी झाला होता, तर 2024 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना शनिवारी झाला होता. या सर्व स्पर्धेत भारताने जेतेपद राखले आहे.

आता, 9 मार्च रोजी होणारा अंतिम सामना रविवारी आहे, ज्यामुळे चाहत्यांचा मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की भारत रविवारी अंतिम सामना जिंकू शकतो का. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, संघाच्या सध्याच्या फॉर्म, खेळाडूंची क्षमता आणि सामन्याच्या परिस्थितीवर विजय अवलंबून असतो. इतिहासातील दिवसांवर आधारित निष्कर्ष काढणे योग्य नाही. भारताच्या संघाने या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे, त्यांच्या सध्याच्या फॉर्मनुसार ते अंतिम सामन्यातही सहज विजय मिळवू शकतात. (India Cricket Final Match on Sunday)

अंतिम सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. जर 9 मार्च रोजी सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर तो 10 मार्च रोजी पुन्हा खेळवला जाईल. जर राखीव दिवशीही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये विभागली जाईल.

हेही वाचा-

चॅम्पियन्स ट्रॅाफी फायनलनंतर हे भारतीय क्रिकेटर होतील रिटायर, पाहा यादी!
न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारताच्या विजयाचे सूत्रधार ठरतील का हे 4 खेळाडू?
दुबईतील खेळपट्टी भारतासाठी लाभदायक? मोहम्मद शमीने गौतम गंभीरच्या वक्तव्याला दिले उत्तर!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---