भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात गुरुवारपासून (१८ ऑगस्ट) ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ तयारीला लागला आहे. या मालिकेसाठी प्रभारी कर्णधार शिखर धवन याच्याजागी पुनरागमन करत असलेल्या केएल राहुल याला कर्णधारपदी निवडले गेले आहे. राहुलच्या पुनरागमनाने भारतीय संघातील सलामीवीरांच्या संख्या आता ५ वर पोहोचली आहे. अशात कोणत्या खेळाडूंना सलामीसाठी संधी मिळेल आणि कोणाला बाकावर बसवले जाईल?, हा पेच निर्माण झाला आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघ ५ सलामीवीरांना (Five Openers) घेऊन गेला आहे. यामध्ये कर्णधार केएल राहुल(KL Rahul), उपकर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan), शुबमन गिल (Shubman Gill), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि यष्टीरक्षक इशान किशन (Ishan Kishan) यांचा समावेश आहे. हे पाचही फलंदाज सध्या चांगल्या फॉर्मात असून सलामीच्या स्थानावर मुख्य भूमिका बजावू शकतात. परंतु जर या पाचही जणांना प्लेइंग इलेव्हनमध्ये फिट बसवायचे असल्यास फलंदाजी क्रमात बदल करावे लागू शकतात.
सलामीसाठी कर्णधार-उपकर्णधाराची जोडी
झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार राहुल आणि उपकर्णधार धवन सलामीवीरांच्या रूपात दिसू शकतात. दुखापतीतून बरे होत झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमन करण्यासाठी राहुल सराव करताना दिसत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेला तो आशिया चषक २०२२ साठीची तयारी म्हणून पाहिल. दोघांनाही सलामीला फलंदाजी करण्याचा चांगलाच अनुभव आहे. तसेच इशान, ऋतुराज आणि गिलपेक्षा दोघेही वरिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांनी सलामीला उतरणे निश्चित आहे.
मधल्या फळीत गिल आणि इशानला संधी
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशानला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतला जाऊ शकते. परंतु त्याला सलामीला नव्हे तर मधल्या फळीत खेळवले जाऊ शकते. तसेच गिलचे मागील काही महिन्यांतील प्रदर्शन पाहता त्यालाही झिम्बाब्वेविरुद्ध खेळवले जाणे निश्चित आहे. गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जाऊ शकते. तर इशान चौथ्या क्रमांकावर उतरू शकतो.
ऋतुराजला बसावे लागू शकते बाकावर
प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ सलामीवीरांना जागा बनवण्यात यश येईल. परंतु युवा ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वे दौरा जिंकण्यासाठी राहुलकडे आहेत ‘हे’ ३ हुकमी एक्के! कोणत्याही क्षणी निकाल बदलण्यात पटाईत
काही लोक तुम्हाला ते भारतीय क्रिकेटपटू असल्याचे सांगतील, त्यांना विना ओळखपत्र आत सोडू नका





