भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात येत्या काही दिवसात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहे. मंगळवारी (२७ जुलै) भारतीय संघातील खेळाडूंनी डरहॅम क्रिकेट क्लबच्या मुख्य खेळपट्टीवर सराव केला आहे. ज्याचे फोटो बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
भारतीय संघ आगामी कसोटी मालिकेत विजय मिळवण्यासाठी कसून सराव करत आहे. नुकत्याच काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध पार पडलेल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडू फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. या सराव सामन्यात कोरोनाची लागण झाल्यामुळे क्वारंटाईन असल्याने युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला सहभाग घेता आला नव्हता. पण आता तो देखील कोरोनावर मात करत भारतीय संघात दाखल झाला असून सरावास त्याने सुरुवात केली आहे.
बीसीसीआयने एका ट्विटमध्ये म्हटले की, “भारतीय संघ पुन्हा एकदा एकत्र आला आहे. इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाने डरहॅमच्या मुख्य खेळपट्टीवर कसून सराव केला आहे.’ तसेच त्यांनी या ट्विटमध्ये कसोटीवीर चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अगरवाल आणि कर्णधार विराट कोहली यांचे सराव करत असतानाचे फोटो शेअर केले आहेत.
तसेच भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अनुभवी सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांनी देखील या सराव सत्रात सहभाग घेतला होता. काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध काउंटी सिलेक्ट इलेव्हन या संघाविरुद्ध झालेला सराव सामना अनिर्णीत राहिला होता. या सराव सामन्यात केएल राहुलने शतक झळकावले होते. तर रवींद्र जडेजाने अर्धशतकी खेळी केली होती.(Team india having s centre Wicket training at Durham cricket club,bcci share photo)
#TeamIndia back at it and having a centre wicket training at Durham Cricket Club ahead of the five-match Test series against England.#ENGvIND pic.twitter.com/Y71qe4b4mo
— BCCI (@BCCI) July 27, 2021
— BCCI (@BCCI) July 27, 2021
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धीमान साहा, अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव
राखीव खेळाडू : प्रसिद्ध कृष्णा, अरजन नगवासवाला
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
निराशा आणि फक्त निराशा! तिरंदाजीतील पराभवामुळे तरुणदीप राय ऑलिंपिकमधून बाहेर
पहिले अर्जून पुरस्कार विजेते नंदू नाटेकर काळाच्या पडद्याआड; भारतीय क्रीडा क्षेत्रात शोककळा
हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना