आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारतीय संघ दोन्ही वेळा अंतिम फेरीत पोहोचला. जरी भारताला अद्याप चॅम्पियनशिप जिंकण्यात यश मिळालं नसलं, तरी एकंदरीत कसोटी क्रिकेटमध्ये भारतापेक्षा चांगली आकडेवारी इतर कोणत्याही संघाची नाही.
दरम्यान, आता आणखी काही आकडे समोर आले आहेत, ज्यामुळे इंग्लंडच्या ‘बेझबॉल’ क्रिकेटचा पर्दाफाश झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा संघ आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु सिक्स मारण्याच्या बाबतीत भारतीय संघ इंग्लंडच्या खूप पुढे आहे.
वास्तविक, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावे आहे. WTC च्या इतिहासात टीम इंडियानं आतापर्यंत एकूण 339 षटकार मारले. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघानं 290 पेक्षा कमी षटकार मारले आहेत.
31 ऑगस्ट 2024 पर्यंत बोलायचं झाल्यास, भारतीय संघ 339 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा संघ 284 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघानं अद्याप षटकारांचं द्विशतकही पूर्ण केलेलं नाही. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियानं WTC च्या फक्त 169 षटकार मारले आहेत.
पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विजेता न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर असून, त्यांच्या नावे एकूण 145 षटकार आहेत. वेस्ट इंडिज 131 षटकारांसह पाचव्या तर श्रीलंका 129 षटकारांसह सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघ 128 षटकार मारून सातव्या क्रमांकावर आहे. तर आठव्या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत 103 षटकार मारले आहेत. बांगलादेशच्या फलंदाजांना अद्याप षटकारांचं शतक पूर्ण करता आलेलं नाही. संघ 63 षटकारांसह नवव्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा –
5 दिग्गज क्रिकेटपटूंचे मुलं ज्यांना वडिलांप्रमाणे यश मिळालं नाही, अवघ्या काही सामन्यांमध्ये संपली कारकीर्द
जागतिक क्रिकेटचा नवा ‘सिक्सर किंग’! ख्रिस गेलचा 9 वर्ष जुना विक्रम उध्वस्त
बॅटिंगनंतर जो रुटची फिल्डिंगमध्येही कमाल! कसोटीतील राहुल द्रविडचा मोठा रेकॉर्ड धोक्यात