---Advertisement---

Video: टीम इंडियाने असा साजरा केला स्वातंत्र्यदिन

On: बुधवार, ऑगस्ट 15, 2018 7:48 PM
---Advertisement---

आज भारतात 72 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघानेही लंडनमध्ये ध्वजारोहन केले आहे.

याचा व्हिडिओ बीसीसीआयच्या वेबसाइटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन सदस्य ध्वजारोहनासाठी उपस्थित होते.

तसेच भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या व्हिडिओच्या शेवटी कर्णधार विराट कोहलीने सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विराट म्हणाला, “भारतीय संघातर्फे इंग्लंडमधून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!”

याबरोबरच अनेक आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंनी सोशल मिडियावरुन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1029575218451234817

https://twitter.com/hardikpandya7/status/1029569010453671937

भारतीय संघाची सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरु असून पहिल्या दोन्ही सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. भारताचा इंग्लंड विरुद्ध तिसरा सामना नॉटिंगहॅमला ट्रेंट ब्रिज मैदानावर 18 आॅगस्टपासून सुरु होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

जेव्हा स्टुअर्ट ब्रॉडचे वडीलच घेतात त्याची हॅट्रिकची संधी हिरावुन

हरमनप्रीत कौरची किया सुपरलीगमध्ये धमाकेदार खेळी

जेव्हा आयसीसीच्या क्रमवारीत सर्वच खेळाडू येतात अव्वल स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment