भारतीय संघाचा नियमीत कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२२ नंतर सध्या विश्रांतीवर आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे आणि रोहित शर्मा या मालिकेसाठी उपस्थित नाहीये. उभय संघातील या मालिकेचा पहिला सामना गुरुवारी (९ जून) खेळला गेला. दक्षिण आफ्रिका संघाने हा सामना ७ विकेट्सने जिंकला. पराभवानंतर भारतीय चाहत्यांना रोहितची कमतरता नक्कीच जाणवली.
रोहित शर्मा (Rohit Sharma) जर संघासोबत उपस्थित असता, तर संघाची विजयाची शक्यता वाढते, यात कसलीही शंका नाही. कारण यापूर्वीचे संघाचे प्रदर्शन त्या पद्धतीचे राहिले आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताने खेळलेल्या मागच्या सहा सामन्यांचा विचार केला, तर ते सर्वच्या सर्व सामने भारताने गमावले आहेत. रोहितच्या अनुपस्थितीत संघाने केलेल्या या निराशाजनक प्रदर्शनावरून त्याचे संघातील महत्व सिद्ध होते.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना भारताने मोठी धावसंख्या उभी केली होती, पण दक्षिण आफ्रिकी फलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये ताबडतोड फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि सामना जिंकला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत असताना ४ विकेट्सच्या नुकसानावर तब्बल २११ धावा चोपल्या. यामध्ये सलामीवीर फलंदाज इशान किशनचे महत्वाचे योगदान होते. इशानने ४८ चेंडूत ७६ धावा चोपल्या आणि संघाला एक चांगली सुरुवात दिली.
भारताचा दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकावाड मात्र २३ धावा करून बाद झाला. तसेच वरच्या फळीतील श्रेयस अय्यरने ३६ धावा केल्या, ज्या संघासाठी महत्वाच्या होत्या. आफ्रिकी संघासाठी एन्रीच नॉर्किया, डॅनियल पिटोरीयस, केशव महाराज, वॅन पार्नेल या चौघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात आफ्रिकी संघ ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.१ षटकात जिंकला.
मध्यक्रमात रस्सी व्हॅन डर दुसेन आणि डेविड मिलरने शतकीय भागादीरी पार पाडली आणि संघाला विजय देखील मिळवून दिला. दुसेनने ७५, तर मिलरने ६४ धावांचे योगदान दिले. भारताच्या भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. पण त्यांना स्वतःच्या संघाला विजय मात्र मिळवून देता आला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मिलर- रस्सीपुढे भारतीय गोलंदाजांची दैना, दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने काबीज केला पहिला सामना