महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शुक्रवारी (04 ऑक्टोबर) संध्याकाळी दुबईत हा सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारताच्या प्लेइंग इलेव्हनबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या सामन्यासाठी हरमनप्रीत कौरचा फलंदाजीचा क्रमांक बदलण्यात आला आहे. हरमनप्रीतचे प्रमोशन करण्यात आले आहे. याचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो. स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे भारत देशाचे लक्ष या सामन्याकडे आहे.
टीम इंडियाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांनी हरमनप्रीतसह प्लेइंग इलेव्हनवर प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकइन्फोच्या बातमीनुसार, ते म्हणाले, ‘या सामन्यात हरमनप्रीतला बढती दिली जाईल. ती वरच्या फळीत येईल. ती तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. हा निर्णय फार पूर्वी घेण्यात आला होता. हरमनप्रीत सहसा चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येते. पण आता न्यूझीलंडविरुद्ध ती तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने अनेक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. ती अनुभवीही आहे. तिने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास भारताला त्याचा फायदाच होऊ शकतो. जर विकेट लवकर पडली तर ती अधिक फलंदाजी करू शकेल आणि अधिक धावा देखील करू शकती. टीम इंडियाची ही रणनीती न्यूझीलंडविरुद्ध प्रभावी ठरू शकते.
शफाली वर्मा आणि स्मृती मानधना टीम इंडियासाठी सलामी देऊ शकतात. हे दोघेही अनुभवी असून त्यांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये जेमिमाह रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांची जागाही जवळपास निश्चित आहे. रेणुका सिंह आणि राधा यादव यांना संधी मिळू शकते. टीम इंडिया आपल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला कडवी टक्कर देण्यसाठी सज्ज आहे.
हेही वाचा-
सूर्यकुमार यादव की शिवम दुबे, रोहित शर्माचा विक्रम कोण मोडणार?
लग्न बंधनात अडकला दिग्गज फिरकीपटू, क्रिकेट जगतातील अनेक स्टार्सची उपस्थिती
द्विशतक हुकले पण टीम इंडियासाठी दावा मजबूत, इराणी कपमध्ये या खेळाडूची मोठी कामगिरी