भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्या (बुधवार 16 ऑक्टोबर) पासून सुरुवात होत आहे. पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. याआधी भारतीय संघाने आपल्या मादेशातील हंगामाची जोरदार सुरुवात केली. भारताने बांग्लादेशचा कसोटी मालिकेत 2-0 आणि टी-20 मालिकेत 3-0 असा पराभव केला. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे पुढील लक्ष्य किवी संघाला 3-0 ने क्लीन स्वीप करणे आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024 च्या अंतिम फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकणे हे असेल. अशा परिस्थितीत या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते हे जाणून घेऊयात.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाबद्दल बोलायचे तर या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो. कर्णधार रोहित फलंदाजी क्रमवारीत कोणताही बदल करणार नाही. परंतु गोलंदाजीमध्ये बदल दिसू शकतो. टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाजांऐवजी दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते आणि अशा परिस्थितीत दोन फिरकीपटूंऐवजी तीन फिरकीपटू प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतात. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबत कुलदीप यादवचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
कुलदीप यादव खेळला तर वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराजला बाहेर बसावे लागू शकते. जसप्रीत बुमराहसोबत आकाश दीप वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसेल. आकाश दीप बांग्लादेशविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळला. मात्र, कुलदीपला चेन्नई किंवा कानपूरच्या घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात संधी मिळाली नाही. आता कुलदीप यादव येथे खेळू शकतो, अशी अपेक्षा आहे. याशिवाय संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप.
हेही वाचा-
पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडिया बाहेर, जाणून घ्या सेमीफायनलमध्ये कोणचा प्रवेश
इम्पॅक्ट प्लेअर नियमाला लाल दिवा! बीसीसीआयचा धक्कादायक निर्णय
WT20 World Cup; भारतीय संघाचे टी20 वर्ल्ड कपचे स्वप्न भंगले; पुन्हा हाती निराशा…!