श्रीलंका दौऱ्यावर रियान परागचा संघात समावेश झाल्याने सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला होता. दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या उपस्थितीवर काही लोकांनी बीसीससीआय आणि निवड समितीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित झाले होते. आता त्याने आपल्या कामगिरीने उत्तर दिले आहे. पहिल्या टी20 सामन्यात त्याच्या बॅटने फारशी कामगिरी केली नाही, परंतु त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यामुळे भारतीय संघाने विरोधी संघावर 43 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
भारतीय संघासाठी पहिल्या टी20 सामन्यात रियान पराग सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दरम्यान, त्याने 6 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 7 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये वेगवान धावा काढण्याचा प्रयत्न करत असताना मथिशा पाथिरानाच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू झाला.
फलंदाजीत फ्लॉप ठरल्यानंतर रियान परागवर गोलंदाजीत चांगली कामगिरी करण्यासाठी त्याच्यावर दबाव होता. पण त्या परिस्थितीत त्याने कमाल करुन दाखवली. संघासाठी त्याने पहिल्या सामन्यात गोलंदाजी करताना रियानने 1.2 षटके टाकला. ज्यामध्ये त्याने 5 धावा देत तीन विकेट्स मिळवल्या. टी20 सामन्यात पहिल्यांदाच गोलंदाजी करताना रियानने कमिंदू मेंडिस, महेश थिक्षाणा आणि दिलशान मदुशंका यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
RIYAN PARAG, THE NEW GOLDEN ARM OF INDIA. 🇮🇳 🔥 pic.twitter.com/HSDG0yl7KB
— Johns. (@CricCrazyJohns) July 27, 2024
सामन्यादरम्यान पहिले विकेट मिळवल्यानंतर पराग खूपच उत्साहित दिसत होता. तो मैदानात आक्रमक पद्धतीने विकेट घेकल्याचा आनंद साजरा करत असताना सूर्यकुमार यादवने काहीतरी बोलले त्यावर तो जोरजोरात हसायला लागला. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी20 सामना आज (28 जुलै) रविवारी होणार आहे. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर आजच्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया टी20 मालिका आपल्या नावे करण्यासाठी आज मैदानात उतरेल.
हेही वाचा-
स्टार खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे! वेस्ट इंडिजसाठी खेळणार टी20 विश्वचषक
चेहऱ्यावर बॉल लागला, रक्त निघालं, तरीही हार मानली नाही; या भारतीय गोलंदाजाच्या धैर्याला तोड नाही!
अरे.. हे काय? श्रीलंकेच्या या गोलंदाजाच्या कृतीने वेधलं अख्या क्रिकेट जगताचं लक्ष