---Advertisement---

U-19 T20 WC 2025; टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक, जेतेपदासाठी या संघाशी भिडणार

On: शुक्रवार, जानेवारी 31, 2025 3:23 PM
---Advertisement---

सध्या अंडर 19 महिला टी20 विश्वचषकाचे आयोजन केले जात आहे. ज्यामध्ये भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळवण्यात आला. भारतीय महिला संघाने हा सामना सहज जिंकला आहे. टीम इंडियाने हा सामना 9 विकेट्सने जिंकला आहे. भारताच्या विजयासह, इंग्लंडचा स्पर्धेतील प्रवास संपला आहे. तर टीम इंडियाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने येणार आहेत. 

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात खेळताना संघाला मर्यादित 20 षटकात 8 गडी गमावून फक्त 113 धावा करता आल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत आधीच सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

भारताकडून वैष्णवी शर्मा आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर आयुषी शुक्लाला दोन विकेट्स मिळाले. इंग्लंडकडून फक्त डेव्हिना पेरिन आणि अबी नॉरग्रोव्ह यांनीच फलंदाजीत चांगली खेळी खेळली. डेव्हिना पेरिनने 45 आणि अबी नॉरग्रोव्हने 30 धावा केल्या.

धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने केवळ एक विकेट गमावून 15 षटकांत 117 धावांचे लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे खूप सोपे होते. भारतीय सलामीवीरांनी एकहाती खेळ करत सामना आपल्या बाजूने वळवला. कमलिनी आणि गोंगडी त्रिशा यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात कमलिनीने 56 धावांची खेळी खेळली. तर गोंगाडीने 35 धावा केल्या. टीम इंडियाचा अंतिम सामना 02 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.

हेही वाचा-

संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्ती
विराटला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सागवान आहे तरी कोण? पाहा आकडेवारी
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर.!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---